Agri Business Idea:- आजच्या कालावधीमध्ये शेती केवळ उपजीविकेचे पारंपरिक साधन नसून ते आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख साधन बनले आहे. तंत्रज्ञानाचा वापराने शेती आता व्यावसायिक दृष्टिकोनातून केली जाते. तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतीमध्ये झालेले यांत्रिकीकरण यामुळे आता शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतात.
आजकाल शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे पिके घेऊन आर्थिक उत्पादन वाढवण्याच्या दिशेने खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करताना दिसून येतात. याप्रमाणेच तुम्ही देखील शेतीतून चांगली कमाई करण्याचा मार्ग शोधत असाल तर आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये एक चांगला पर्याय सांगणार आहोत. ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शेतातील मोकळ्या जागेचा देखील सदुपयोग करू शकता व लाखो रुपये कमवू शकतात.

शेतातील मोकळ्या जागेत करा सागाची लागवड
झाड म्हटले म्हणजे मानवी जीवनासाठी एक महत्त्वाचा घटक असून जीवनाकरिता आवश्यक असलेला ऑक्सिजनचा प्रमुख स्त्रोत झाडे आहेत. तसेच झाडांच्या माध्यमातून फळे तसेच फुले व औषध तसेच लाकडासारख्या अनेक गरजा देखील पूर्ण केल्या जातात. परंतु काही झाडे अशी आहेत की वरील गरजा पूर्ण करतातच.
आपल्याला आर्थिक उत्पन्न देखील देतात. त्यामुळे आता भारतातील शेतकरी अनेक प्रकारच्या आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेल्या झाडांच्या लागवडीकडे वळताना दिसून येत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक भविष्य देखील सुरक्षित करण्यास वाव आहे.
या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या वृक्षांचा विचार केला तर यामध्ये सागाची लागवड किंवा साग हा वृक्ष खूप फायद्याचा ठरू शकतो. सागाची लाकडे ही खूप मूल्यवान असून फर्निचर उद्योगांमध्ये या लाकडांची मागणी सातत्याने वाढताना दिसून येत आहे. तसेच सागवान लाकडांची एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना वाळवी लागत नाही. इतर झाडांच्या लाकडापेक्षा त्यांची किंमत जास्त मिळते.
सागाची लागवड कशी करावी?
सागाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची पूर्व मशागत करून आठ बाय आठ फूट आणि एक बाय एक फुटाचे खड्डे खोदून घ्यावेत व उन्हाळ्यामध्ये हे खड्डे चांगले तापू द्यावेत. त्यानंतर मृग नक्षत्राच्या सुरुवातीला जो पहिला पाऊस पडतो तो पडल्यानंतर हे खड्डे शेणखत तसेच बुरशीनाशक,
थायमेट इत्यादी टाकून भरून घ्यावेत व त्यामध्ये रोपांची लागवड करावी. लागवड झाल्यानंतर बेड पाडून घ्यावे व पावसाचे पाणी जास्त झाले तरी बेड असल्याकारणाने झाडांच्या मुळाजवळ पाणी जमत नाही व नुकसान होत नाही.
साधारणपणे जून, जुलै आणि ऑगस्ट हा साग लागवडीसाठी उत्तम कालावधी मानला जातो. कारण या कालावधीमध्ये वातावरणात ओलावा असतो व पाऊस पडत असल्यामुळे लागवड केलेल्या साग रोपांची मर होत नाही.
सागाच्या लागवडी योग्य जाती
कोन्नी सागवान, पश्चिमी आफ्रिकन सागवान, गोदावरी सागवान, दक्षिण आणि मध्य आफ्रिकन सागवान आणि निलांबर सागवान या सागाच्या काही जाती असून त्या लवकर तयार होतात. त्याच्या लागवडीकरता लोकांची लागवड करताना टिशू कल्चरची रोपे लावली तर ती एकदम सरळ व उंच वाढतात
तसेच त्यांना दुसरे फाटे फुटत नाही आणि लाकूड सरळ असल्यामुळे त्यांना मागणी जास्त असते. तुम्हाला जर टिशू कल्चर रोपे हवे असतील तर तुम्ही सरकारमान्य नर्सरी किंवा दुसऱ्या एखाद्या नर्सरी मधून देखील उपलब्ध होऊ शकतात. टिशू कल्चर रोपांचा फायदा म्हणजे ते इतर रोपांपेक्षा जलद गतीने वाढतात. कमी जमीन असेल तर तुम्ही सागाची लागवड शेताच्या बांधावर देखील चहू बाजूने करू शकतात व जास्त जमीन असलेले शेतकरी एकर, दोन एकर क्षेत्रावर साग लागवडीतून उत्तम पैसा मिळवू शकतात.
आंतर पिकातून मिळवू शकतात अतिरिक्त उत्पन्न
जोपर्यंत सागाची रोपे लहान असतात तोपर्यंत तुम्ही उंच वाढणारे पिकांचा आंतरपीक म्हणून सागात लागवड करू शकतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्ही मक्याचे किंवा कपाशीची लागवड देखील करू शकतात. त्यानंतर सागाची झाडे मोठी झाल्यानंतर तुम्ही लहान वाढणारी कमी उंचीची पिके आंतरपीक म्हणून घेऊ शकतात. यामध्ये तुम्ही भुईमूग तसेच मूग, उडीद तसेच अद्रक व कपाशी इत्यादी पिकांचा समावेश करू शकतात.