Agri Processing Business:- सध्या शेती क्षेत्र पाहिले तर प्रचंड प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांमधून जात असल्याचे चित्र असून आर्थिक दृष्टिकोनातून खूप विपरीत परिणाम यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर होताना दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षापासून सातत्याने होत असलेली निसर्गाची अवकृपा आणि प्रत्येकच शेतीमालाचे घसरलेले बाजारभाव यामुळे चहूबाजूने शेतकरी घेरले गेले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे या समस्येवर जर शेतकऱ्यांना मात करायची असेल तर शेतीसोबत शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांमध्ये येणे शेतकऱ्यांसाठी काळाची गरज आहे. कारण शेतकरी कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न मिळवून देणारे शेती आधारित अनेक प्रक्रिया उद्योग उभारू शकतात.
इतकेच नाही तर याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाच्या देखील अनेक योजना असून त्या माध्यमातून देखील अशा प्रक्रिया उद्योगांना अनुदान दिले जाते. त्यामुळे जर शेतकरी बंधूंनी सरकारी अनुदानाचा लाभ घेऊन प्रक्रिया उद्योग सुरू केले तर शेतीसोबत एक शाश्वत उत्पन्नाचा चांगला मार्ग शेतकऱ्यांना मिळू शकतो.
या दृष्टिकोनातून आपण शेतकरी कुठले प्रक्रिया उद्योग सुरू करू शकतात? जेणेकरून त्यांना शाश्वत उत्पन्नाचा मार्ग या माध्यमातून सापडेल. यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात घेऊ.
सरकारचे मदत घेऊन सुरू करा हे शेती प्रक्रिया उद्योग
1- कोरफड ज्यूस निर्मिती उद्योग– कोरफड ही आयुर्वेदिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे वनस्पती असून त्यामुळे बाजारपेठेत कोरफडीला खूप मोठी मागणी आहे.
त्यामुळे ती मागणी डोळ्यासमोर ठेवून कोरफडीपासून ज्यूस बनवण्याचा प्रक्रिया उद्योग कमी खर्चामध्ये अधिक आर्थिक उत्पन्न शेतकऱ्यांना देऊ शकतो.
2- पापड उद्योग– आपल्याला माहित आहे की जेव्हा उन्हाळ्याचा कालावधी सुरू होतो तेव्हा प्रत्येक घरामध्ये महिलावर्ग कूरड्या पासून तर पापडापर्यंत अनेक खाद्यपदार्थ तयार करण्याच्या घाईगडबडीत असतात. परंतु यामध्ये जर तुम्ही पापड बनवण्याला व्यवसाय दृष्टिकोनातून प्राधान्य दिले व पापड निर्मिती उद्योग उभारला तर शेती सोबत हा उद्योग खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला आर्थिक उत्पन्न देऊ शकतो.
हा गृह उद्योग स्वरूपात सुरू करता येणाऱ्या उद्योग असून महिलावर्ग याला अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात. विशेष म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सरकारकडून देखील अनुदान मिळू शकते.
पापड तयार करण्याची प्रक्रिया अगदी सहज आणि सोपी असल्यामुळे तुम्ही कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन या माध्यमातून मिळवू शकतात. दहा,वीस आणि चाळीस पापडांची पॅकिंग करून तुम्ही याची विक्री करू शकतात.
3- नाचणीची बिस्किटे तयार करण्याचा उद्योग– भारत सरकारच्या माध्यमातून देशांमध्ये तृणधान्य आणि भरडधान्यांना मोठ्या प्रमाणावर चालना देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत व सरकारच्या यासाठी वेगवेगळ्या योजना देखील आहे.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून आता तृणधान्यांना मोठ्या प्रमाणावर पसंती देखील दिली जात आहे. त्यामुळे शहरी भागामध्ये देखील आता अशा तृणधान्यांपासून प्रक्रिया केलेल्या उत्पादनांची मागणी वाढत आहे. या पद्धतीचा व्यवसाय तुम्ही कमीत कमी भांडवलात सुरू करू शकतात व स्थानिक स्तरावरच याची बाजारपेठ मिळवू शकतात.
या पद्धतीने तुम्ही सरकारची मदत घेऊन नाचणी किंवा मिलेट पासून बिस्किट बनवण्याचा व्यवसाय सुरू करून चांगला आर्थिक नफा मिळवू शकतात.
नाचणी पासून बिस्किट बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला शुद्ध तूप, लोणी तसेच नाचणी, साखर अथवा गूळ, बेकिंग पावडर, व्हॅनिला पावडर तसेच आवश्यक पॅकेजिंग साहित्याची आवश्यकता तुम्हाला भासते.
4- लोणचे बनवण्याचा व्यवसाय– भारतीय आहारामध्ये लोणच्याला खूप महत्त्व आहे असे कोणतेही घर तुम्हाला सापडणार नाही की घरामध्ये लोणचे असणार नाही. त्यामुळे लोणचे बनवण्याचा व्यवसाय हा तुम्ही कमी खर्चात सुरू करू शकतात व चांगला नफा मिळवू शकतात.
यामध्ये तुम्ही कैरी तसेच लिंबू, हळद, मिरची अशा विविध पदार्थांपासून लोणची बनवण्याचा व्यवसाय करू शकतात. महाराष्ट्र मध्ये देखील अनेक महिला एकत्र येऊन गटाने असा व्यवसाय करत आहेत. यामध्ये तुम्ही लिंबू, कैरी तसेच मिरची, लिंबू मिरचीचे लोणचे,
करवंदे लोणचे, आवळ्याचे लोणचे तसेच फणस लोणचे, आल्याचे लोणचे असे विविध प्रकारचे लोणचे बनवून त्याची विक्री करून चांगला नफा मिळवू शकतात.
5- ज्वारी रवा उत्पादन व्यवसाय– तृणधान्यांपासून विविध उत्पादने तयार करण्याचा व्यवसायाला देखील आता खूप मोठी संधी असून बाजारपेठेत देखील अशा उत्पादनांना मागणी आहे.
ज्वारी, रवा किंवा इडली रवा अशा प्रकारे उद्योगांना मोठी मागणी आहे. त्यामुळे ज्वारी रवा उत्पादन व्यवसायातून देखील तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक नफा मिळवू शकतात मोठ्या प्रमाणावर प्रगती करू शकतात.