Agro Tourism: 2 हेक्टर जमिनीत एकदा केलेली गुंतवणूक पिढीजात देत राहील लाखात उत्पन्न! वाचा कृषीपर्यटना विषयी ए टू झेड माहिती

Ajay Patil
Updated:
agro tourisam

Agro Tourism:- शेतीसोबत जे काही अनेक प्रकारचे शेतीपूरक व्यवसाय केले जातात त्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळत असते. नुसते शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा शेतीपूरक व्यवसायाची  उभारणी करून नक्कीच शेती व त्यासोबत व्यवसाय शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी खूप उपकारक ठरतात. जर आपण शेतीपूरक व्यवसायाची यादी पाहिली तर ती भलीमोठी आहे.

परंतु त्यामध्ये जर आपण कृषी पर्यटन या नाविन्यपूर्ण संकल्पनेचा विचार केला तर अलीकडील काळामध्ये खूप पुढे येत असलेली संकल्पना असून त्यामध्ये प्रामुख्याने शेती पाहणी किंवा शेती कामाचा अनुभव, ग्रामीण भागातील व त्या ठिकाणचे नैसर्गिक वातावरण आणि अशा निसर्ग संपन्न वातावरणामध्ये शहरी भागापासून थोडे दूर राहून ग्रामीण भागाचा अनुभव शहरी लोकांना यावा या दृष्टिकोनातून कृषी पर्यटन व्यवसायाला खूप मोठी संधी आहे.

एवढेच नाही तर शासनाच्या माध्यमातून देखील आता कृषी पर्यटनाला चालना देण्याकरिता अनेक योजनांची आखणी देखील करण्यात आली आहे. या दृष्टिकोनातून आपण या लेखात कृषी पर्यटन नेमके काय आहे व ते कशा पद्धतीने केले जाते व शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होऊ शकतो? इत्यादी बद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 कृषी पर्यटन केंद्र कुणाला सुरू करता येते?

याकरिता जर आपण प्रामुख्याने विचार केला तर कमीत कमी शेतकऱ्याकडे दोन हेक्टर जमीन असणे गरजेचे असून त्या जमिनीमध्ये उत्तम प्रकारे पाण्याची सोय, एखादा जल स्त्रोत आणि पर्यटकांना विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या आणि इतर सेवा देण्याची इच्छा व आवड असलेली व्यक्ती व थोडा बोलका स्वभाव असेल तर उत्तमच.

या गोष्टी ज्या शेतकऱ्याकडे आहेत ते शेतकरी कृषी पर्यटन केंद्र सुरू करू शकतात. वैयक्तिक शेतकऱ्या व्यतिरिक्त कृषी सहकारी संस्था तसेच प्रशासकीय संस्था, कृषी विद्यापीठे आणि कृषी महाविद्यालयांमध्ये देखील अशी केंद्र सुरू करता येणे शक्य आहे.

India: All Listings - Agritourism World

 कृषी पर्यटन केंद्राकरिता आवश्यक गोष्टी

या कृषी केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी चांगला रस्ता किंवा महामार्ग असेल तर अधिक उपयुक्त ठरते. अशा महामार्ग किंवा रेल्वे मार्गाच्या निकट कृषी पर्यटन केंद्र उभारले तर अधिक उपयुक्त ठरते. सोबतच जवळ जर काही नैसर्गिक पर्यटन स्थळे किंवा ऐतिहासिक स्थळे असतील तर खूपच फायदा होऊ शकतो.

 कृषी पर्यटन केंद्राचे फायदे

कृषी पर्यटन केंद्रामुळे शेतकरी कुटुंबातील सदस्यांना व तरुणांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी निर्माण होतात व शेतकऱ्यांसाठी शेती उत्पन्नातील जो काही चढउतार असतो त्याला पर्यायी अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होतो. महत्वाचे म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागामधील आणि त्या ठिकाणच्या काही महत्त्वाच्या घटकांमध्ये सांस्कृतिक समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कृषी पर्यटन केंद्रामुळे ग्रामीण आणि कृषी विकास प्रक्रियेला चालना मिळू शकते.

agro tourism near Pune naturenestt.com

 कृषी पर्यटन केंद्रामध्ये या सुविधांकडे आवश्यक लक्ष द्या

1- पायाभूत सुविधांची उभारणी कृषी पर्यटन केंद्र उभारताना शेतामध्ये ग्रामीण भागाला साजेशी किंवा ग्रामीण स्वरूपाच्या सर्व कमीत कमी आवश्यक सुविधा असतील अशा प्रकारचे फार्म हाऊस  असणे गरजेचे असून शेतीमध्ये झाडे, विविध प्रकारच्या वेली तसेच औषधी सुगंधी वनस्पती यांची लागवड त्यांच्या नावानिशी केलेली असावी.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे पाण्याचे सोय किंवा जलस्त्रोत जवळ असणे गरजेचे आहे. तसेच तुमच्या कृषि पर्यटन केंद्राला जे पर्यटक भेट देतात त्यांना शेतीकाम किंवा स्वयंपाक किंवा अन्य शेतीपूरक कामे करता येतील अशा सोयी असाव्यात. तसेच केंद्रामध्ये पोहण्यासाठी विहीर किंवा तलाव किंवा वेगवेगळे खेळ खेळता येतील अशा सोयी असणे गरजेचे आहे. शेळी फार्म किंवा इमू पालन, रेशीम शेती किंवा ग्रीन हाऊस इत्यादी उभारले असेल तर खूप उत्तम ठरते.

Agri Tourism, Agro Tourism, Agriculture Tourism, Pune, Around Pune

2- पर्यटकांसाठी या सुविधा पुरवल्या तर होईल फायदा कृषी पर्यटन केंद्रामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी नाष्टा तसेच दुपारचे जेवण आणि रात्री अशा तीनही प्रकारच्या जेवणाकरिता आपल्या ग्रामीण भागातील अस्सल झणझणीत मेनू ठेवणे गरजेचे आहे. तसेच ग्रामीण खेळ किंवा कामांमध्ये सहभागी होण्याची पर्यटकांना संधी उपलब्ध करून द्यावी.

ग्रामीण भागातील कला किंवा हस्तकला, या ठिकाणी साजरे केले जाणारे सण व ग्रामीण परंपरा, संस्कृती इत्यादींची माहिती पर्यटकांना व्हावी अशा पद्धतीची सोय उभारणे गरजेचे आहे. तसेच कृषी पर्यटन केंद्रामध्ये बैलगाडी किंवा घोडेस्वारी, जल स्त्रोत असेल तर अशा ठिकाणी पाण्यात म्हशीची स्वारी इत्यादी सुविधा असणे गरजेचे आहे. पर्यटकांसाठी विविध प्रकारची फळे तसेच शेंगदाणे, ऊस आणि इतर शेतातील भाजीपाला किंवा प्रक्रिया उत्पादने त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावीत. तसेच शेकोटी किंवा भजन, लोकगीते किंवा लेझीम नृत्य इत्यादी कार्यक्रम पर्यटकांना पाहता येईल अशा सुविधा उभाराव्यात.

Anjanvel Agro Tourism | WhatsHot Pune

 कृषी पर्यटन व्यवसाय का आहे महत्त्वाचा?

कृषी पर्यटन केंद्रामध्ये जेवणाच्या किंवा राहण्याच्या तसेच इतर सुविधा यांचा खर्च खूप कमी ठेवता येणे शक्य असल्यामुळे शहरातील श्रीमंत लोकांसोबत मध्यमवर्गीयांना  देखील याचा फायदा घेता येऊ शकतो. दुसरे महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण आयुष्य शहरांमध्ये घालवणारे जे काही लोक असतात त्यांना ग्रामीण भागाबद्दल किंवा तेथील एकंदरीत वातावरण किंवा संस्कृती परंपरा तिकडच्या पद्धती जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते व या दृष्टिकोनातून या व्यवसायाला खूप महत्त्व आहे.

कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून सर्व वयोगटातील व्यक्तींकरिता आणि संपूर्ण कुटुंबाला नजरेसमोर ठेवून  मनोरंजनाचे अनेक उपक्रम या माध्यमातून आणि शक्य आहे व या माध्यमातून लोकांना आकर्षित केले जाऊ शकते. यामध्ये ग्रामीण खाद्यपदार्थ तसेच ग्रामीण पेहराव नैसर्गिक घटकांचा समावेश केला तर विविध प्रकारचे मनोरंजन देखील पर्यटकांना देता येते. शहराकडील लोकांना नेहमीच गावाकडील सण तसेच परंपरा व संस्कृती यांचे प्रचंड प्रमाणात आकर्षण असते.

तसेच शेती आणि शेतकऱ्यांच्या अवतीभवतीचे वातावरण, एखाद्या कृषी उत्पादनाची प्रक्रिया पर्यटकांना प्रत्यक्ष पाहता येणे देखील शक्य असते व ते लोकांना आवडते. तसेच फळे आणि अन्नधान्य उत्पादने, काही प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ तसेच सेंद्रिय अन्न निर्मिती व विक्रीला देखील यामध्ये मोठी संधी आहे.

Shivar Agro Tourism

बैलगाडी स्वारी किंवा उंट स्वारी, मासेमारी, ग्रामीण खेळ आणि आरोग्य यामध्ये आयुर्वेदिक माहिती इत्यादी विषयक सुविधा देखील समाविष्ट करून पर्यटन वाढवता येते. आजकालचे जीवन जर पाहिले तर ते प्रचंड ताणतणावाचे असल्यामुळे  काही क्षण आरामात घालवता यावी या दृष्टिकोनातून कृषी पर्यटन केंद्राचे महत्व अनन्यसाधारण आहे. कृषी पर्यटन केंद्रे निसर्गाच्या सानिध्यात असले तर यामध्ये पर्यटनाला खूप मोठी संधी आहे. तसेच या व्यवसायामुळे शहरी विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाची माहिती मिळणे सोपे होते.

या प्रकारे अनेक पद्धतीचा वाव या व्यवसायात असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक उत्तम प्रकारचा शेतीपूरक व्यवसाय ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe