विमान प्रवास झाला स्वस्त; कस ते वाचा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- जगभरात कोरोना संकट आले आणि प्रवास करणे थांबले. लॉकडाऊन असल्यामुळे लोक पण घरीच राहायला लागली.

लोक घरी थांबल्यामुळे प्रवासाला बंधने आली पण आता लोकांनी प्रवास करावा म्हणून विमान कंपन्या नवीन योजना जाहीर करू राहिल्यात.

स्पाईसजेट नावाच्या विमान कंपनीने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी खास Book Befikar Sale आणला आहे. या सेलमुळे देशांतर्गत विमान प्रवासाची किंमत कमी झाली आहे.

देशांतर्गत प्रवास करायचा झाला तर आता आपल्याला ८९९ रुपयांपासून पुढे तिकीट मिळणार आहे. याशिवाय जर काही कारणाने आपल्याला आपल्या प्रवासाचे तिकीट रद्द करायचे असेल तर त्याची सुविधा पण देण्यात आली आहे.

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने ही योजना चालू केल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे की, हे फ्लाईट व्हाउचर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मर्यादित राहणार आहे.

हि ऑफर फक्त देशातल्या देशातच लागू राहणार आहे.हे व्हाउचर भविष्यात नवीन विमान तिकिटांच्या प्रवासासाठी वापरण्यात येईल.या ऑफरची संपूर्ण किंमत कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर टाकल्याची सांगण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment