Amrit Kalash Scheme : गुंतवणूकदारांनो इकडं लक्ष द्या! सर्वात जास्त परतावा देणाऱ्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची संधी

Amrit Kalash Scheme

Amrit Kalash Scheme : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया होय. बँक सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना घेऊन येत असते. या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अमृत कलश योजना लाँच केली आहे.

ही योजना बँकेच्या सर्वसामान्या ग्राहकांच्या खूप फायद्याची योजना आहे. परंतु आता या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची संधी तुमच्याकडे आहे. कारण तुमच्याकडे या योजनेत 15 ऑगस्टनंतर गुंतवणूक करता येणार नाही.

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकेकडून विशेष मुदत ठेवी ज्या अमृत कलश आणि अमृत महोत्सव एफडी म्हणून ओळखल्या जात आहेत. परंतु या या दोन्ही योजना उद्या म्हणजे 15 ऑगस्ट रोजी संपणार आहेत.

ही बँक नियमित नागरिकांसाठी वार्षिक ७.१०% दराने ‘अमृत कलश’ रिटेल मुदत ठेव योजना देत आहे. तर या ठेवीची मुदत 400 दिवस इतकी आहे. आता ज्येष्ठ नागरिक 7.60% व्याजदरासाठी पात्र आहेत.

जाणून घ्या TDS आणि मिळणारे व्याज

स्टेट बँकेची ही विशेष एफडी योजना प्रत्येक महिना, 3 महिने आणि 6 महिन्यांच्या आधारावर व्याज देत आहे. तसेच TDS मधून व्याज कापून खात्यात जमा करण्यात येते. आयकर नियमांनुसार टीडीएस आकारण्यात येतो. तसेच ठेवीदार फॉर्म 15G/15H चा वापर करून आयटी नियमांतर्गत कर कपातीतून सूट मागू शकतो. बँक आपल्या सामान्य नागरिकांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 3% ते 7% तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50% आणि 7.50% च्या दरम्यान व्याजदर देत आहे.

जाणून घ्या IDBI बँक अमृत महोत्सव मुदत ठेव

या बँकेकडून 375 आणि 444 दिवसांच्या मुदतीसाठी ऑफर करण्यात आलेली एक अनोखी मुदत ठेव आहे. ही बँक आपल्या नियमित, NRR आणि NRO ग्राहकांना 444 दिवसांच्या अमृत महोत्सव मुदत ठेव योजनेअंतर्गत 7.15% व्याज दर देत आहे. तसेच ही बँक ज्येष्ठ नागरिकांना ७.६५% व्याज देत आहे. तर बँक आपल्या नियमित, NRE आणि NRO ग्राहकांना 375 दिवसांच्या अमृत महोत्सव FD योजनेअंतर्गत 7.10% व्याज दर देत आहे.

ही बँक या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६०% व्याजदर देत आहे. सामान्य नागरिकांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 3% ते 6.80% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50% आणि 7.30% च्या दरम्यान व्याजदर मिळते.

काही खास योजना

इंडियन बँकेच्या विशेष मुदत ठेवी IND SUPER 400 DAYS आणि IND SUPREME 300 DAYS आहेत, ज्या 31 ऑगस्ट 2023 रोजी बंद होणार आहेत. पंजाब आणि सिंध 400 दिवस आणि 601 दिवसांच्या कालावधीसाठी जास्त व्याजदर देत असून त्यात गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 ही आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe