Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारकडून प्रत्येक वर्गातील लोकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. अशातच देशातील प्रत्येक घटकाला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देखील एक योजना राबवली जात आहेत, या योजनेचे नाव जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्मान भारत योजना असे आहे.
या योजनेद्वारे अल्प उत्पन्न गट आणि मध्यमवर्गीय लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. केंद्र सरकारची ही योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती. ज्याचा उद्देश अल्प उत्पन्न गटातील लोकांना आरोग्य सुविधा पुरवणे असा आहे. काय आहे ही योजना आणि कशी काम करते चला जाणून घेऊया…
आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता काय आहे?
आयुष्मान योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर पात्रता आवश्यक आहे. सरकारने गरीब आणि दुर्बल घटकांसाठी ही योजना आणली आहे. तुम्हाला पात्रता जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला PMJAY च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला मी पात्र आहे हे टॅब करावे लागेल.
यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. जिथे तुम्ही पात्रता सहज तपासू शकता. या पेजवर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड नंबर भरावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या पात्रतेबद्दल काही मिनिटांतच कळेल.
फायदे :-
या योजनेअंतर्गत लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळतात. यासोबतच रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील १५ दिवसांचा सर्व खर्च सरकार कडून केला जातो. या योजनेची विशेष बाब म्हणजे यामध्ये कुटुंबातील सर्व लोकांना त्यांचे वय लक्षात घेऊन लाभ दिला जातो.
आवश्यक कागदपत्रे ?
आयुष्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो इ.
योजनेसाठी अर्ज कसा करावा?
-यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आयुष्मान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
-यानंतर, नवीन नोंदणीसाठी तुम्हाला नवीन नोंदणी किंवा अर्जावर टॅब करावा लागेल.
-यानंतर तुम्हाला तुमचे नाव, लिंग, आधार क्रमांक, शिधापत्रिका इत्यादींची माहिती द्यावी लागेल.
-माहिती भरल्यानंतर तुम्हाला चेक क्रॉस करणे आवश्यक आहे.
-यानंतर, सर्व आवश्यक कागदपत्रे देखील अपलोड करावी लागतील.
-यानंतर, तुमचा अर्ज तपासा आणि सबमिट करा.
-अर्ज सादर केल्यानंतर अधिकाऱ्याला अर्जाचा आढावाही घ्यावा लागणार आहे.
-यानंतर तुम्हाला आयुष्मान भारत योजनेचे कार्ड सहज मिळेल.