Bank Charges : आजकाल प्रत्येकजण बँकिंग सेवा वापरतो. सध्या या सेवा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही उपलब्ध आहेत. एसएमएस ट्रान्झॅक्शन असो, फंड ट्रान्सफर, चेक क्लिअरन्स असो किंवा एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा असो, सर्व सुविधा बँक पुरवत आहे. पण बँक कोणतीही सुविधा पूर्णपणे मोफत देत नाही.
बँका त्यांच्या सेवांसाठी ग्राहकांकडून विविध प्रकारचे शुल्क आकारतात. पण हे शुल्क किती प्रकारचे असते हे तुम्हाला माहिती आहे का? बँका दरवर्षी तुमच्याकडून किती शुल्क आकारते हे आज आपण जाणून घेणार आहोत.
रोख व्यवहार
प्रत्येक बँक एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच रोख व्यवहारांना परवानगी देते. जर तुम्ही त्या मर्यादेपेक्षा जास्त रोख व्यवहार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागते. सामान्यतः सरकारी बँकांमध्ये ते 20 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत असते.
किमान शिल्लक
बँक खात्यातील शिल्लक एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ठेवावी लागते. जर तुमच्या खात्यातील रक्कम त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला किमान शिल्लक शुल्क भरावे लागते.
एसएमएस शुल्क
तुमच्या खात्यात पैसे जमा किंवा डेबिट झाल्यावर बँक तुम्हाला एक अलर्ट संदेश पाठवते. यासाठी बँका तुमच्याकडून शुल्कही घेतात. प्रत्येक बँकांचे शुल्क वेगवेगळे असते.
एटीएम व्यवहार
एटीएममधून पैसे काढण्याची मोफत सुविधा केवळ मर्यादेपर्यंत उपलब्ध आहे. यासाठी बहुतांश बँका 20 ते 50 रुपये आकारतात.
IMPS शुल्क
सर्व बँकांनी ग्राहकांसाठी NEFT आणि RTGS व्यवहार मोफत केले आहेत, परंतु बहुतांश बँका अजूनही IMPS व्यवहारांसाठी शुल्क आकारतात. हे शुल्क 1 रुपये ते 25 रुपयांपर्यंत असू शकते.
चेक फी आणि चेक क्लिअरन्स
जर तुमचा चेक 1 लाख रुपयांपर्यंतचा असेल तर तुम्हाला बँकेला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, परंतु यापेक्षा जास्त चेकसाठी तुम्हाला क्लिअरन्स शुल्क भरावे लागते. हे शुल्क 150 रुपये आहे.
कार्ड रिप्लेसमेंट
जर तुमचे डेबिट कार्ड हरवले असेल तर तुम्हाला दुसरे कार्ड घेण्यासाठी शुल्क भरावे लागेल. हे शुल्क 50 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत असू शकते. प्रत्येक बँकेने वेगवेगळे शुल्क निश्चित केले आहे.