Bank FD Scheme:- बँकांच्या मुदत ठेव योजना या गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांमध्ये खूपच लोकप्रिय असून गुंतवणुकीची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि मिळणारा परतावा या दोन्ही बाबतीत बँकांच्या मुदत ठेव योजनांना प्राधान्य दिले जाते.
बँकांच्या मुदत ठेव योजना बघितल्या तर यामध्ये वेगवेगळ्या कालावधी करिता केलेल्या मुदत ठेवीवर वेगवेगळा व्याजदर दिला जातो. यामध्ये सर्वसामान्य ग्राहकांना वेगळा व्याजदर तर ज्येष्ठ नागरिकांना जास्तीचा व्याजदर मिळत असतो.
परंतु भारतातील एक मोठा वर्ग असा आहे की तो बँक एफडीला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्व देतो व एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करतो. कुठल्याही एफडी योजनेमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर ती एका निश्चित कालावधीसाठी करावी लागते व त्यानंतर निश्चित आणि हमी परतावा मिळत असतो.
कालावधीनुसार बघितले तर बरेच लोक एक किंवा दोन वर्षासाठी एफडीमध्ये गुंतवणूक करत असतात. परंतु तुम्हाला जर दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करून नफा मिळवायचा असेल तर खाजगी क्षेत्रातील ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक सारख्या बँका दहा वर्षाच्या दीर्घ कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना सात टक्के व्याजदर सध्या देत आहेत.
या कालावधीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सात टक्के व्याजदरावर तुम्ही दहा वर्षाच्या कालावधीसाठी तुम्हाला जितकी रक्कम गुंतवायचे आहे तितकी गुंतवू शकतात व तुम्हाला केलेल्या गुंतवणुकीवर दुप्पट पैसे मिळतात.
ॲक्सिस बँकेत दहा वर्षाकरिता दहा लाखाची एफडी केल्यास किती परतावा मिळेल?
तुम्ही जर ॲक्सिस बँकेमध्ये दहा वर्षाकरिता दहा लाख रुपयांची एफडी केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर म्हणजेच या एफडी योजनेच्या परिपक्वतेवर 20 लाख 1597 मिळतील.
ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून दहा वर्षाच्या मुदतीच्या एफडी योजनेवर जेष्ठ नागरिकांना 7.75% व्याज दिले जाते. यानुसार जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने या दहा वर्ष मुदतीच्या एफडी योजनेत दहा लाख रुपयांची गुंतवणूक दहा वर्षांसाठी केली तर या एफडी योजनेच्या परिपक्वतेवर 21 लाख 54 हजार 563 रुपये मिळतात.
एचडीएफसी बँकेत दहा वर्षाच्या कालावधीसाठी दहा लाख रुपयांची एफडी केली तर किती परतावा मिळेल?
जर तुम्ही एचडीएफसी बँकेत दहा वर्षासाठी दहा लाख रुपयांची एफडी केली तर या एफडीच्या परिपक्वतेवर तुम्हाला 20 लाख 1463 रुपये मिळतील. एचडीएफसी बँक दहा वर्षांच्या मुदतीच्या एफडी योजनेवर जेष्ठ नागरिकांना 7.50% व्याज देत आहे.
त्यामुळे एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने दहा वर्षाच्या मुदतीच्या एफडी योजनेत दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर संबंधित व्यक्तीला या दहा वर्षाच्या एफडी योजनेच्या परिपक्वतेवर एकूण 21 लाख 2197 रुपये मिळतील.
अशा पद्धतीने तुम्ही या दोन्ही बँकेत जर दहा वर्षांकरिता दहा लाख रुपये गुंतवले तर तुमचे पैसे दुप्पट होतात.