‘या’ सरकारी बँकेकडून कर्ज घ्या आणि पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून छतावर सौर पॅनल बसवा! वाचा संपूर्ण माहिती

Published on -

सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याकरिता केंद्र आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या माध्यमातून सौर पॅनल बसवण्याकरिता अनुदान नागरिकांना देण्यात येत आहे. या योजनांमध्ये नुकतीच केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना ही महत्त्वाची योजना असून या अंतर्गत कमाल 78 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येत आहे.

परंतु अशा योजनांचा लाभ घेताना अगोदर मात्र सोलर सिस्टिम बसवण्याकरिता खर्च करणे गरजेचे असते. तसेच या सर्व सोलर सिस्टिमचा खर्च काही लाखात असल्यामुळे प्रत्येकच नागरिकाला तो खर्च करणे शक्य नसल्याने या योजनेचा लाभ घेता येणे अवघड आहे.

परंतु याकरिता देशातील अनेक सरकारी बँका स्वस्त व्याजदरामध्ये कर्ज देत असून यामध्ये बँक ऑफ बडोदाचा देखील समावेश आहे. याबद्दल माहिती देताना बँक ऑफ बडोदाने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की, पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत कर्ज अशा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे

की ज्यांच्या नावावर निवासी मालमत्ता आहे  व सुलभ अटी आणि शर्तींसह आकर्षक व्याजदरात हे कर्ज दिले जात आहे. विशेष म्हणजे बँक ऑफ बडोदा हे प्रकल्प खर्चाच्या 90% पर्यंत कर्ज पुरवठा या माध्यमातून करणार आहे.

 या कर्जासाठी किती आकारला जात आहे व्याजदर?

पीएम सूर्यघर योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक सात टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. यामध्ये या योजनेतून लाभार्थ्यांना 78 हजार रुपयांपर्यंतच्या अनुदान देण्यात येत आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क भरण्याची गरज नाही.

एवढेच नाही तर या कर्जामध्ये फ्लोटिंग आणि निश्चित व्याजदराचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच या कर्जाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्हाला 3kW पर्यंत क्षमतेचा युनिट बसवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कोणत्याही उत्पन्नाच्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही.

 बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून याकरिता कोणाला मिळू शकते कर्ज?

बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून देण्यात येणारे हे कर्ज निवासी व्यक्ती, पगारदार किंवा व्यवसाय, शेती व्यवसायातून मिळत असलेले उत्पन्न असलेले लोक या योजनेसाठी पात्र आहेत. या कर्जासाठी किमान वय 21 आणि कमाल वय 65 वर्ष ठेवण्यात आले आहे. तसेच बँकेने याबाबत वेबसाईटवर माहिती देताना म्हटले आहे की, पीएम सूर्य घर योजना कंपोझिट अंतर्गत कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोर 680 पेक्षा कमी नसावा.

 या कर्जासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल?

1- त्यामध्ये अर्जदार/ सह अर्जदारांची केवायसी कागदपत्रे

2- मागील तीन महिन्यांची पगार स्लिप आणि फॉर्म क्रमांक 16/ आयटीआर( पगारदार व्यक्तींकरिता)

3- मागील दोन वर्षांचा आयटीआर( पगार नसलेल्या व्यक्तींच्या बाबतीत )

4- स्थानिक सक्षम महसूल प्राधिकरणाकडून नवीनतम उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजेच उत्पन्नाचा दाखला( शेतकऱ्यांसाठी)

5- मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट

6- विज बिल

 यामध्ये तीन केव्ही पर्यंत युनिट क्षमतेकरिता कोणत्याही उत्पन्न दस्तऐवजाची आवश्यकता भासणार नाही.

 पीएम सूर्यघर योजनेतून किती मिळते सबसिडी?

केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून 1kW साठी तीस हजार रुपये,2kW युनिट क्षमतेसाठी 60000 रुपये आणि 3kW क्षमतेच्या युनिट करता 78 हजार रुपये अनुदान दिले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe