Gold-Silver Rate: बापरे! 1 तोळा सोन्याचा दर 1 लाख रुपये पर्यंत जाणार? सोन्याच्या दरात तेजी अशीच राहणार? वाचा काय म्हणतात तज्ञ?

Published on -

Gold-Silver Rate :- सध्या सोने व चांदीच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली असून दररोज नवनवीन उच्चांक गाठले जात आहेत. जर आपण गेल्या वर्षभराचा विचार केला तर सोने व चांदीच्या दरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तेजी आली असून

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये 24 कॅरेट सोने हे 21.17% वाढीसह 12,784 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचे दर 11 हजार 710 रुपयांनी वाढल्याचे समोर आले आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर 11 एप्रिल 2023 रोजी 24 कॅरेट सोने 60390 रुपये प्रति तोळा आणि 22 कॅरेट सोने 55 हजार 317 रुपये प्रति तोळा होते.

चांदीचा दर देखील पहिल्यांदा 84 हजार रुपये प्रतिकिलो जवळ पोहोचला असून शुक्रवारी चांदीचा दर 1476 रुपयांनी वाढून 81819 रुपये प्रति किलो या विक्रमी दारापर्यंत पोहोचला. गेल्या सात दिवसात सोन्याच्या दरात साडेचार ते पाच हजार रुपये तर चांदीच्या दरात जवळपास आठ हजार रुपयांची वाढ झाली आहे.

या सगळ्या सोने व चांदीच्या दरवाढीच्या कालावधीमध्ये सोने व चांदीच्या दराबाबत एक बातमी समोर आली असून त्यानुसार सोन्याचा दर हा एक लाख रुपये प्रतितोळा होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

सोन्याचा दर एक लाख रुपये प्रति तोळा पोहोचणार?

यामध्ये मुथूट फायनान्स चा विचार केला तर त्यांनी गोल्ड रेट अर्थात सोन्याच्या दराच्या संदर्भात एक टार्गेट दिले असून त्यांच्या मते सोन्याच्या दरात सुरू असलेली जी काही तेजी आहे ती यापुढील कालावधीमध्ये देखील अशीच कायम राहण्याची शक्यता आहे.

इतकेच काय तर 2029 पर्यंत सोन्याचे दर एक लाख रुपये प्रतीतोळा पर्यंत जाऊ शकतात. सोन्याचे दर दहा ग्रॅम म्हणजेच एक तोळ्याकरिता एक लाख एक हजार 786 रुपये होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. 2028 पर्यंत सोन्याचे दर प्रतितोळा 92 हजार 739 रुपये होण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

सोने व चांदीच्या दरात का होत आहे वाढ?

जर आपण याबाबत तज्ञांचे मत पाहिले तर त्यांच्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोने व चांदीच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे. तसेच सोने व चांदीच्या बाजाराला मजबूत संकेत मिळत असल्यामुळे त्याचा परिणाम भारतात पाहायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचे दर 2300 डॉलर प्रतिऔंस पर्यंत असून सोने चांदीची वाढती मागणी आणि त्यासोबतच गुंतवणुकीसाठी एक सुरक्षित पर्याय असल्यामुळे सोने चांदीच्या दरात सुरू असलेली तेजी कायम राहू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe