Post Office Scheme : पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतणूक मानली जाते. म्हणूनच सर्वसामान्य लोकं येथे गुंतणूक करण्यास प्राधान्य देतात. पोस्ट ऑफिस देखील ग्राहकांसाठी अनेक चांगल्या योजना राबवते, ज्या गुंतवणूकदारांना भविष्यात श्रीमंत होण्यास मदत करतात. भविष्याचा विचार करून गुंतवणूकदार येथे गुंतवणूक करतात.
वाढती महागाई पाहता भविष्यासाठी पैसे गुंतवणे फार महत्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे असेच वाटते. दरम्यान, तुम्हालाही भविष्यात मोठी कमाई करायची असेल, तर आज आम्ही तुम्हाला जबरदस्त योजना सांगणार आहोत. जिथे पैसे जमावून तुम्ही भविष्यात चांगला निधी उभारू शकता.

येथे गुंतवणूक करून कमी वेळात मोठी तुम्ही मोठी रक्कम कमावू शकता. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव आवर्ती ठेव योजना आहे, जी सर्वात लोकप्रिय योजना मानली जाते. या योजनेवर लोकांना बंपर लाभ मिळत आहे. जर तुम्ही देखील येथे गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर व्याजाच्या स्वरूपात भरघोस परतावा मिळेल.
पोस्ट ऑफिसने सुरू केलेली आरडी योजना देखील उत्तम बचत योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला काही आवश्यक अटींसह गुंतवणूक करावी लागते. यामध्ये तुम्हाला वार्षिक आधारावर योग्य व्याज मिळत राहतात, म्हणूनच ही योजना लोकांची मने जिंकत आहे. पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीमची कालमर्यादा ५ ते १० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
येथे तुम्हाला तुमच्या आवडीची टाइम फ्रेम निवडावी लागेल. येथे गुंतवणुकीनंतर तुम्हाला चांगली एकरकमी रक्कम मिळेल. तुम्हाला या योजनेत दरमहा 1,000 रुपये गुंतवावे लागतील. त्यानुसार, पाच वर्षांत तुम्ही 60,000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता, आणि त्यावर चांगला परतावा देखील मिळवू शकता. या गुंतवणुकीवर तुम्हाला पाच वर्षांत 1.20 लाख रुपये मिळतील. तर या योजनेतील दहा वर्षांची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर सुमारे 1.69 लाख रुपये मिळतील.