Best Post Office Schemes : भविष्याच्या दृष्टीने बचत करणे फार महत्वाचे आहे, सरकार देखील बचतीला वाव देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे, अशातच पोस्टाद्वारे देखील अनेक योजना राबवल्या जात आहेत, जिथे गुंतवणूक करून तुम्हाला अधिक फायदे मिळतात. आज पगारातून काही बचत केली तर तुम्ही तुमचे पुढचे आयुष्य अगदी आरामात जगू शकता.
तसे पाहायला गेलं तर, आज बाजारात गुंतवणुकीची अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. सेवानिवृत्तीनंतरही लोकांचे उत्पन्न कायम राहावे यासाठी तुम्ही आतापासूनच गुंतवणूक करायला हवी.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या खास योजनेबद्दल सांगणार आहोत जिथे गुंतवणुकीवर कोणत्याही जोखमीशिवाय चांगला परतावा मिळत आहे. पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही भविष्यात 9 हजार रुपये मासिक उत्पन्न मिळू शकता. होय, ते कसे जाणून घेऊया…
पोस्ट ऑफिस बचत योजना
पोस्ट ऑफिसच्या लोकप्रिय योजनांमध्ये मासिक उत्पन्न योजनेचा समावेश होतो. यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. ज्यामध्ये लहान मुले व युवक सर्व लाभ घेऊ शकतात. ही योजना गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे.
म्हणजे त्यावर मिळणारा व्याजदर खूप चांगला आहे. यामध्ये ठराविक वेळेनंतर उत्पन्न मिळते. या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणुकीवर बाजारातील जोखमीचा कोणताही परिणाम होत नाही.
तुम्ही किती काळ गुंतवणूक करू शकता?
सरकारच्या या योजनेत गुंतवणूक केल्याने पैसे तर सुरक्षित राहतातच शिवाय बँकांकडून जास्त पैसेही मिळतात. 5 वर्षांसाठी केलेली गुंतवणूक खूप फायदेशीर ठरते. यामध्ये तुम्ही एका खात्याद्वारे किमान 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकता. संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. जास्तीत जास्त 3 लोक संयुक्त खाते उघडू शकतात.
या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.४ टक्के दराने वार्षिक व्याज मिळते. 12 महिन्यांत विभागून मासिक परतावा मिळतो. तुम्हाला मासिक पेमेंट नको असल्यास, पैसे तुमच्या खात्यात जमा होत राहतील. ज्यावर मासिक व्याज देखील मिळत राहील.
मासिक नऊ हजार रुपये कसे मिळवायचे?
तुम्हाला येत्या भविष्यात मासिक 9 हजार रुपयांचा परतावा हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला संयुक्त खाते उघडावे लागेल. यामध्ये, जर तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला 1.11 लाख रुपये व्याज मिळेल. ज्यामध्ये तुम्ही 12 महिन्यांत पसरवून 9,250 रुपये मासिक परतावा मिळवू शकता.
याशिवाय, तुम्हाला एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये वार्षिक व्याज म्हणून 66,600 रुपये म्हणजेच 5,550 रुपये मासिक परतावा मिळू शकतो.