अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या दिग्गज ई-कॉमर्स कंपनीविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याची योजना आखली आहे. गुटखा व इतर साहित्य विक्री संदर्भात प्रकरणामुळे ही कारवाई केली जाईल.
महिनाभर चौकशी चालली :- वास्तविक, महिनाभराच्या तपासणीनंतर राज्य एफडीए गुटखा, पान मसाला वेंडर्स सह Amazon आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स दिग्गजांवर फौजदारी कारवाई करणार आहे.
एफडीएच्या चौकशीत असे समोर आले आहे की ई-कॉमर्स कंपनी आणि त्याचे विक्रेते पान मसाला, गुटखा आणि सुगंधी सुपारी विकत आहेत.
एफडीएने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ई-कॉमर्स कंपन्यांना राज्यात पान-गुटखा उत्पादने विक्री करण्यास बंदी घातली आहे.
अशा परिस्थितीत अशा गोष्टी करणे खूप चुकीचे आहे. आम्ही केलेल्या तपासणीत ही बंदी घातलेली उत्पादने विकल्याच्या संदर्भात योग्य पुरावे सापडले आहेत.
17-28 डिसेंबर दरम्यान तपासणी केली :- पुरावा गोळा करण्यासाठी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी 17 ते 28 डिसेंबर दरम्यान ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विविध विक्रेत्यांकडून उत्पादने खरेदी केली.
सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या चिंतेमुळे 2012 मध्ये राज्य सरकारने गुटखा व इतर संबंधित प्रोडक्टच्या उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घातली होती.
एफडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपासणी पूर्ण झाल्यानंतर विक्रेते आणि ई-कॉमर्स कंपन्यांविरूद्ध महाराष्ट्रात बंदी घातलेल्या खाद्यपदार्थाच्या विक्रीसाठी राज्य सरकारच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल फौजदारी कारवाई सुरू केली जाईल.
अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 च्या संबंधित कलमांखाली यात सहा वर्षे तुरूंगवासाची शिक्षा आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved