Gold Silver Price : भारतात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध झालेले आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिसची एफडी आणि आरडी योजना, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीची बचत योजना यांसारख्या अनेक योजना गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या आहेत.
याशिवाय अनेक जण शेअर मार्केटमध्ये देखील गुंतवणूक करत आहेत. शेअर मार्केटशी संलग्न असलेल्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र असे असले तरी भारतात फार पूर्वीपासून सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा मोठा कल राहिला आहे.
प्रामुख्याने महिला सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याला विशेष प्राधान्य देतात. सोने सातत्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. तथापि शेअर मार्केटशी तुलना केली असता हा परतावा कमीच भासतो. मात्र असे असले तरी आजही देशातील अनेक गुंतवणूकदारांना सोन्यात आणि चांदीत गुंतवणूक केली तर लॉस होणार नाही असे वाटते.
जर तुम्हीही सोन्यात किंवा चांदीत गुंतवणूक करण्याची तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास आणि अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्राने काल अर्थातच 22 जानेवारी 2024 ला एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सोने-चांदी तसेच मौल्यवान धातूंच्या नाण्यांवर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या शुल्कात मोठी वाढ झाली असून आता मौल्यवान धातूच्या नाण्यावरील आयात शुल्क 15 टक्के एवढे झाले आहे. यामध्ये दहा टक्के सीमाशुल्क आणि पाच टक्के कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर यांचा समावेश आहे. फक्त नाण्यांवरच नाही तर सोने आणि चांदीच्या वस्तूंवरही आयात शुल्क वाढवण्यात आले आहे.
यामुळे देशात सोन्याच्या आणि चांदीच्या किमती वाढतील असा दावा तज्ञांनी केला आहे. खरे तर सोने आणि चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात हे आपल्याला ठाऊकच असेल. मात्र यावर आयात शुल्काचा देखील परिणाम पाहायला मिळतो.
आयात शुल्क जर वाढले तर देशात किमती वाढतात. अशा परिस्थितीत आता शासनाने सोने आणि चांदीच्या वस्तूंवरील आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतलेला असल्याने याचा परिणाम म्हणून देशात सोने आणि चांदीच्या किमती वाढणार आहेत यात शंकाच नाही. दरम्यान शासनाने घेतलेला हा निर्णय कालपासूनच अर्थातच 22 जानेवारी 2024 पासूनच लागू होणार आहे.