अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या नवनवीन प्लॅन बाजारात आणत आहेत. लॉकडाउनच्या काळात इंटरनेटचा वाढता वापर पाहता अनेक नवनवीन स्कीम अनेक कंपन्यांनी बाजारात आणल्या आहेत.
नवीन ग्राहकांना आकर्षित करणे आणि त्यांना तसा बेनिफिट देणे हे लक्ष्य आणि उद्दीष्ट ठेऊन अनेक कंपन्या आपले प्लॅन्स आणत आहेत.
आता बीएसएनएलने जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या आघाडीच्या खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. 199 रुपये या नव्या प्रीपेड प्लॅनची किंमत आहे. तसेच अनेक चेंजही केले आहेत. चला जाणून घेऊयात तपशीलवार माहिती –
बीएसएनएलचा 199 रुपयांचा प्लॅन:- बीएसएनएलच्या नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना हायस्पीड डेटासह कॉलिंगची सुविधाही मिळते. या नव्या प्रीपेड प्लॅनची वैधता 30 दिवस आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळेल. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी दररोज 250 मिनिटे मिळतील. तसेच दररोज 100 एसएमएस देखील वापरण्यास मिळतील. मात्र, या अॅपमध्ये ओटीटी अॅपचं सबस्क्रिप्शन मिळणार नाही. 24 डिसेंबरपासून हा नवीन प्लॅन देशातील सर्व सर्कलमध्ये उपलब्ध होईल.
‘ह्या’ प्लॅनमध्ये मिळणार एक्स्ट्रा डेटा:- 199 रुपयांच्या प्लॅनसोबतच कंपनीने 998 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारी डेटा मर्यादाही 1जीबीने वाढवली आहे. आता या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3जीबी डेटा मिळेल. आधी या प्लॅनमध्ये केवळ 2जीबी डेटा मिळायचा. अतिरिक्त डेटा 24 डिसेबरपासून मिळण्यास सुरूवात होईल.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये