Business Idea:- जर आपण व्यवसायाची यादी पाहिली तर यामध्ये असे अनेक व्यवसाय दिसून येतात की भांडवल कमीत कमी आणि घरी बसून तुम्हाला प्रति महिना खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक नफा मिळवता येतो. व्यवसायांच्या यादीमध्ये अनेक छोटे मोठे व्यवसाय असतात व त्यांची मागणी देखील प्रचंड प्रमाणात असते. फक्त आपल्याला आपल्या मनाची तयारी करून संबंधित व्यवसाय उभारणी करिता प्रयत्न करणे गरजेचे असते व व्यवसाय उभारणे महत्त्वाचे असते.
याच अनुषंगाने जर आपण महिला वर्गाचा विचार केला तर बऱ्याच महिला या घरकाम करणाऱ्या असतात व घराचे काम आटोपून त्यांच्याकडे मोकळाच वेळ असतो. या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करण्याच्या दृष्टिकोनातून जर घरी बसून एखादा व्यवसाय महिलांनी करायचे ठरवले तर कुटुंबाला आर्थिक मदत तर होईलच परंतु वेळ देखील सत्कारणी लागेल हे मात्र निश्चित. याच दृष्टिकोनातून आपण या लेखात महिलांसाठी महत्त्वाचा असलेला झाडू बनवण्याचा व्यवसाय व त्यापासून मिळणारे आर्थिक उत्पन्न त्याबद्दलची माहिती घेणार आहोत.
झाडू बनवण्याचा व्यवसाय देईल महिन्याला 30 ते 40 हजार रुपये उत्पन्न
झाडू आपल्याला सगळ्यांना माहिती असून याला प्रचंड प्रमाणात बाजारात मागणी असते. तर सध्या आपण झाडू बनवण्याची पद्धत पाहिली तर बरेच झाडू हाताने बनवले जातात. परंतु आता झाडू बनवण्यासाठी देखील अनेक यंत्रे बाजारपेठेत उपलब्ध झाली असून या माध्यमातून आता अगदी आरामशीरपणे झाडू बनवण्याचे काम करता येते.
हा व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर तुम्हाला फार जास्त जागेची गरज भासत नाही. तुम्ही तुमच्या घराच्या अगदी छोट्याशा खोलीतून किंवा एखाद्या छोट्याशा जागेतून देखील हा व्यवसाय सुरू करू शकतात. हा व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हाला सुरुवातीला दहा हजार ते वीस हजार रुपयांपर्यंत भांडवल गुंतवणुकीची गरज भासू शकते.
याकरिता तुम्हाला झाडू बनवण्याकरिता लागणारे साहित्य खरेदी करणे गरजेचे असते. याकरिता नारळाच्या झापळ्या, गवत तसेच खजुराची पाने इत्यादी पासून झाडू बनवला जातो. त्यामुळे हे साहित्य तुम्हाला लागेल. तसेच झाडूला मूठ म्हणजेच हँडल बसवण्याकरिता तुम्हाला हँडल कप खरेदी करावा लागेल तुम्हाला तो बाजारातून स्वस्त दरामध्ये उपलब्ध होऊ शकतो.
सर्वसाधारण खरेदी केल्यानंतर तुम्ही तुमच्या घरच्या लोकांचे मदत घेऊन किंवा झाडू बनवण्याचे यंत्र खरेदी करून झाडू बनवू शकतात. तयार झाडू चांगल्या पद्धतीने विकण्याकरिता तुम्हाला आकर्षक पॅकेजिंग मध्ये ते पॅक करणे गरजेचे आहे. आकर्षक पॅकिंग हे चांगल्या दर्जाच्या विक्रीसाठी महत्त्वाचे असते.
झाडू बनवण्याच्या व्यवसायामधून तुम्ही किती कमाई करू शकतात?
झाडू बनवल्यानंतर तुम्ही बाजारामध्ये त्याची विक्री करू शकतात किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या माध्यमातून त्याची विक्री व्यवस्थापन करू शकता. एवढेच नाही तर तुमचा झाडू आकर्षक असेल व व्यवस्थित पॅकिंग असेल तर तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स साईटचा देखील वापर करून झाडुंची विक्री करू शकतात. जर तुमच्या झाडू बनवण्याच्या व्यवसायाला तुम्ही मोठे मोठे दुकाने आणि मॉलशी कनेक्ट केले तर तुम्हीप्रत्येक महिन्याला 30 ते 40 हजार रुपये सहजपणे कमवू शकतात.