Business Idea:- शिक्षण झाले आहे आणि नोकरी नाही अशी परिस्थिती आज अनेक तरुणांची झाली असून हाताला काम मिळवण्यासाठी तरुणांना भटकण्याची वेळ सध्या आलेली आहे व हीच बेरोजगारीची समस्या भारतापुढील एक ज्वलंत असा प्रश्न आहे.
त्यामुळे आता बरेच तरुण जरी उच्चशिक्षित असले तरी देखील ते आता व्यवसायांच्या माध्यमातून आयुष्यामध्ये सेटल होण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघितले तर अनेक छोटे मोठे व्यवसाय करून आजकालची तरुणाई खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झाल्याचे आपण पाहतो.
अगदी याच पद्धतीने जर तुम्हाला देखील एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल व कमीत कमी गुंतवणुकीत करता येणाऱ्या व्यवसायाच्या शोधात तुम्ही असाल तर या लेखात दिलेल्या एका व्यवसायाची माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.
टी–शर्ट प्रिंटिंग व्यवसाय कमी खर्चात देईल तुम्हाला चांगले उत्पन्न
टी शर्ट प्रिंटिंग व्यवसायाला खूप मागणी असून कमी खर्चामध्ये हा व्यवसाय तुम्हाला सुरू करता येतो. जर आपण आज बाजारपेठेतील या व्यवसायाची मागणी बघितली तर जवळपास सर्व सेवा पुरवठादार तसेच शोरूम व रेस्टॉरंट मधील कर्मचाऱ्यांनी आता छापील टी-शर्ट परिधान करण्याचा ट्रेंड सुरू आहे.
तसेच ग्रामीण भागामध्ये देखील स्थानिक पातळीवर अनेक टूर्नामेंट्स भरवल्या जातात व अशावेळी देखील प्रिंटेड टी-शर्टची मागणी मोठ्या प्रमाणावर असते.
विविध सण उत्सवाच्या कालावधीमध्ये देखील प्रिंटेड टी-शर्ट परिधान करण्याचा ट्रेंड मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याने या व्यवसायाच्या माध्यमातून कमी गुंतवणुकीत चांगला पैसा मिळवता येऊ शकतो.
कसा सुरू करावा हा व्यवसाय?
कमीत कमी गुंतवणुकी तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायासाठी लागणाऱ्या गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून बघितले तर किमान 70 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करून तुम्ही महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये आरामात कमवू शकतात.
या व्यवसायासाठी कच्चामाल म्हणून तुम्हाला टी-शर्ट लागेल व त्यासोबत प्रिंटर तसेच हिट प्रेस, कंप्यूटर आणि कागद इत्यादी साहित्य देखील लागेल. तुम्ही जर टी-शर्ट प्रिंट करण्यासाठी मॅन्युअल मशीन घेतले तर एका मिनिटात एक टी-शर्ट प्रिंट करता येते.सुरुवातीला टी-शर्ट प्रिंटिंग करिता एक मशीनची आवश्यकता भासते व या मशीनची किंमत 50 हजार रुपये इतकी आहे.
तसेच प्रिंटिंग करिता पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट लागतो व त्याची जर बाजारात किंमत पाहिली तर 100 ते 120 रुपयांमध्ये टी-शर्ट मिळते. एक टी-शर्ट प्रिंटिंग करायला एक ते दहा रुपये पर्यंत खर्च येतो व चांगली प्रिंटिंग हवी असेल तर थोडा जास्त खर्च येतो.
साधारणपणे एक टी-शर्ट प्रिंटिंग करण्याकरिता 20 ते 30 रुपयापर्यंत खर्च येतो व तुम्ही त्याची विक्री दोनशे रुपयांपासून ते तीनशे रुपये पर्यंत करू शकतात. म्हणजे साधारणपणे एका टी-शर्ट च्या माध्यमातून तुम्ही 50% पर्यंत कमाई करू शकता.
ऑनलाइन प्लॅटफॉर्मची मदत घेऊन विक्री वाढवणे गरजेचे
तुम्ही तयार केलेले टी-शर्ट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील विकू शकतात. याकरिता तुम्हाला खूप कमी खर्च करावा लागतो व स्वतःचा एक ब्रँड देखील तुम्ही तयार करणे यामध्ये गरजेचे असते.
एवढेच नाही तर तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या मदतीने देखील हे प्रिंटेड टी शर्ट ऑनलाईन पद्धतीने विकू शकतात. एकदा का हा व्यवसाय वाढायला लागला तर तुम्ही त्या माध्यमातून वाढीव नफा मिळवू शकतात. तुम्हाला जर जास्त क्वांटिटी मध्ये टी-शर्ट प्रिंट करायचे असतील तर तुम्हाला अधिक महागडे मशीन यासाठी खरेदी करावे लागेल.