Business Idea: बँकेप्रमाणे तुम्ही देखील करू शकतात कायदेशीर परवानगीने व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय! कसा काढावा लागतो परवाना?

Ajay Patil
Published:
business idea

Business Idea:- आयुष्य जगत असताना प्रत्येक व्यक्तीला पैशांची गरज भासत असते. परंतु प्रत्येक वेळी ती पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी स्वतःकडे तेवढा पैसा असतोच असे नाही. त्यामुळे बरेच व्यक्ती हे बँक किंवा इतर एनबीएफसी अर्थात नॉन बँकिंग फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतात. यामध्ये आपल्याला जे काही कर्ज दिले जाते त्यावर आपल्याला ठराविक दराने व्याज आकारले जाते.

या व्याजाच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून देशभरातील बँका आणि वित्तीय संस्था मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळवतात. अगदी याच पद्धतीने शहरी भाग असो किंवा ग्रामीण भागात खाजगी म्हणजे सामान्य व्यक्ती देखील पैसे व्याजाने देण्याचा व्यवसाय करतात.

ही परंपरा फार पूर्वापार आपल्या भारतामध्ये चालत आलेली आहे. आज देखील जर आपण खेड्यांचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर अवैध सावकारी मोठ्या प्रमाणावर दिसून येते व अशा सावकारांकडून कर्जरूपाने व्याजावर पैसे घेतले जातात. परंतु जर एखाद्या सामान्य व्यक्ती किंवा सावकार असे व्याजावर पैसे देत असेल

तर त्याकरिता लायसन्स किंवा परवाना आपल्याला लागतो. त्यामुळे तुम्ही देखील हा परवाना काढून व्याजावर पैसे देऊन आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात व हा एक कमाईचा चांगला पर्याय असू शकतो. बँका प्रमाणेच अनेक मायक्रो फायनान्स कंपनी आपल्याला माहिती आहेत की त्या देखील कर्ज आणि व्याज या माध्यमातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत आहे.

याकरिता कायदेशीर परवानगी घेणे गरजेचे असते व तुम्ही देखील जर कायदेशीर परवानगीने  व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही चांगला पैसा मिळवू शकतात.

 काय आहे यासंबंधीचा कायदा?

जर तुम्हाला देखील व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर याकरिता तुम्हाला परवाना घेणे बंधनकारक आहेच व हा परवाना तुम्हाला मुद्रा कर्ज कायद्याच्या माध्यमातून देण्यात येतो. तुम्ही रितसर परवाना घेऊनच हा व्यवसाय करू शकतात. जर तुम्ही परवान्याशिवाय व्याजावर पैसे देणे सुरू केले तर ते बेकायदेशीर असून त्यामुळे तुम्हाला शिक्षा देखील होऊ शकते.

जर आपण व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करण्यासाठीचा आवश्यक परवान्याचा विचार केला तर तो बँक आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपनी यांना रिझर्व बँकेच्या माध्यमातून दिला जातो. परंतु सामान्य व्यक्तीला जर हा परवाना हवा असेल तर तो जिल्हास्तरावर सावकारी कायद्यांतर्गत मिळतो.

या परवान्यामध्ये ज्या काही सूचना दिलेल्या असतात त्यानुसारच कर्जावर व्याज आकारणी गरजेची असते. त्यामध्ये निश्चित दरापेक्षा जास्त व्याज आकारणी कायद्याने गुन्हा मानला जातो. जर आपण याबाबत लाईव्ह लॉचा अहवाल पाहिला तर व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करण्याकरिता मुद्रा कर्ज कायद्याअंतर्गत सरकारी संस्थेच्या माध्यमातून परवाना घेणे गरजेचे आहे.

जर आपण विविध राज्यांचा विचार केला तर प्रत्येक राज्यामध्ये मुद्रा कर्ज देण्याचे कायदे करण्यात आले आहेत व त्यामुळे तुम्ही जिल्हास्तरावरील अधिकृत सरकारी संस्थेच्या माध्यमातून परवाना काढून व्याजावर पैसे देणे सुरुवात करू शकता. याकरिता वेगवेगळ्या राज्यांमध्ये महसूल विभागाच्या माध्यमातून किंवा स्थानिक स्तरावर सरकारने ज्या काही अधिकृत केलेल्या संस्था आहेत किंवा नगरपालिका यांच्या माध्यमातून सावकारी परवाना घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच यामध्ये महत्त्वाचे म्हणजे ज्या व्यक्तीला हा परवाना मिळाला आहे व तो परवाना मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला प्रत्येक वर्षी त्याने किती रक्कम व्याजावर वाटली आहे याचा संपूर्ण हिशोब संबंधित संस्थांना सादर करणे गरजेचे असते. अशाप्रकारे कायद्याच्या चौकटीत राहून परवाना असलेला कोणताही व्यक्ती व्याजावर पैसे देण्याचे काम सुरू करू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe