Property Loan: अचानकपणे पैशांची गरज भासली? ताबडतोब मिळवा प्रॉपर्टी लोन! किती भरावे लागेल व्याज?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Property Loan:- जीवनामध्ये कधी कोणती अडचण येईल व किती पैसा आपल्याला लागेल याची कुठली शाश्वती नसते. जर आपण अचानकपणे उद्भवणाऱ्या संकटांचा विचार केला तर यामध्ये आरोग्य विषयक समस्या या खूप गंभीर आणि कुठलीही पूर्वसूचना न देता उद्भवतात. अचानक घरामध्ये कोणीतरी आजारी पडते व आपल्याला मोठ्या प्रमाणावर दवाखान्याचा खर्च करावा लागतो.

याशिवाय कुटुंबामध्ये लग्न कार्यासारखे समारंभ व इतर काही महत्त्वाच्या गोष्टी करिता पैसा लागतो. अशावेळी बरेच जण कर्जाचा आधार घेतात. याबद्दल प्रामुख्याने पर्सनल लोनचा पर्याय बरेच जण स्वीकारतात. याशिवाय दुसरा एक प्रकार पाहिला तर तो म्हणजे प्रॉपर्टी किंवा मालमत्ता लोन होय.

जर आपण पर्सनल लोनचा विचार केला तर हा असुरक्षित कर्जाचा प्रकार असतो व प्रॉपर्टी लोन हा सुरक्षित कर्जाचा एक प्रकार आहे. यालाच आपण मॉर्गेज कर्ज देखील म्हणतो. या लोनच्या शब्दांमध्येच तुम्हाला याचा अर्थ कळला असेल तो म्हणजे की  असं कर्ज घेण्यासाठी तुम्ही तुमची एखादी व्यावसायिक मालमत्ता किंवा घर बँकेकडे तारण किंवा गहाण ठेवून कर्ज मिळवू शकतात.

 बँक किती देते प्रॉपर्टी लोन?

जर आपण इतर वित्तीय संस्था किंवा बँकांचा विचार केला तर तुम्ही जे काही प्रॉपर्टी बँकेकडे तारण ठेवता त्या मालमत्तेच्या किंवा प्रॉपर्टीचे जे काही मार्केट व्हॅल्युएशन अर्थात बाजार मूल्य आहे त्याच्या 50 ते 70% पर्यंत कर्ज दिले जाते. या कर्जाची परतफेड तुम्ही सुलभ हप्त्यांमध्ये करू शकतात.

आपण पर्सनल लोनचा विचार केला तर त्या तुलनेमध्ये व्याजदराच्या दृष्टिकोनातून प्रॉपर्टी लोन हे फायद्याचे ठरते. कारण पर्सनल लोन पेक्षा प्रॉपर्टी लोन वर व्याजदर कमी असतो.

यामध्ये तुम्ही तारण देत असलेल्या मालमत्तेचे उत्पन्न आणि क्रेडिट इतिहास आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टी बँकेकडून पाहिल्या जातात. मात्र यामध्ये लक्षात घेण्याची बाब म्हणजे वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर हे वेगवेगळे असल्यामुळे सदरील बँकेचा व्याजदर नेमका काय आहे हे अगोदर तपासून घेणे खूप गरजेचे आहे.

 देशातील काही महत्त्वाच्या बँकांचे प्रॉपर्टी लोनचे व्याजदर

जर आपण देशातील अग्रगण्य असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया चा विचार केला तर ही बँक साधारणपणे 10.60 ते 11.30% वार्षिक व्याजदराने प्रॉपर्टी लोन देते व या बँकेचा कर्जाचा कालावधी हा पाच ते पंधरा वर्षाचा असतो.

या तुलनेमध्ये जर आपण एचडीएफसी बँकेचा विचार केला तर ही बँक प्रॉपर्टीचे जे काही एकूण मूल्य आहेत त्याच्या 60 टक्क्यांपर्यंत कर्ज देते. एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून पंधरा वर्षापर्यंत नऊ ते 16.50% या व्याजदराने प्रॉपर्टी लोन दिले जाते. तसेच ॲक्सिस बँक हे पाच लाख ते पाच कोटी रुपये पर्यंतच्या प्रॉपर्टीवर कर्ज देते.

 प्रॉपर्टी लोनवर टॅक्सचा लाभ मिळतो का?

जर याबाबत आपण आयकर कायदा 1961 च्या कलम 37(1) अंतर्गत पाहिले तर मालमत्तेवरील कर्ज म्हणजेच प्रॉपर्टी लोनवर तुम्ही जे काही व्याज भरलेले आहे त्या व्याजावर कर सुट उपलब्ध असून कर्जाची रक्कम नवीन घर खरेदीसाठी वापरली असल्यास तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 24 च्या अंतर्गत तुम्ही  जे काही व्याज भरले आहे त्यावर तुम्हाला तब्बल दोन लाख रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते.

 इतर लोनच्या तुलनेत प्रॉपर्टी लोन कसे आहे फायद्याचे?

विशेष म्हणजे हे एक सुरक्षित कर्ज असते व त्यामुळे तुमच्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्युएशन नुसार तुम्हाला जास्तीत जास्त कर्जाची रक्कम मिळणे शक्य आहे. प्रॉपर्टी लोनचा कालावधी हा वीस वर्षाचा असून तुम्ही कमीत कमी ईएमआय आणि सहज परतफेड करण्याची सुविधा देखील तुम्हाला दिली जाते

व एवढेच नाही तर या प्रॉपर्टी लोनमध्ये बॅलन्स ट्रान्सफर सुविधा देखील तुम्हाला मिळते. त्यामुळे तुम्ही सध्याचे तुमच्या जे काही कर्ज आहे ते दुसऱ्या बँके कडे कमी व्याजदर किंवा कर्जाच्या चांगल्या अटींवर ट्रान्सफर देखील करू शकता.

त्यामुळे तुम्ही इमर्जन्सी कालावधीमध्ये जर प्रॉपर्टी लोनचा पर्याय निवडला तर तुम्हाला अशा पद्धतीचे फायदे मिळतात.