Business Idea : कमी गुंतवणुकीत सुरु करा कधीही न बंद पडणारा व्यवसाय, अशी करा सुरुवात

Published on -

Business Idea : जर तुम्हाला नोकरीचा कंटाळा आला असेल आणि तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. आता तुम्ही कधीही न बंद पडणारा व्यवसाय सुरु करून लाखो रुपये कमावू शकता.

आता तुम्ही गॅस एजन्सीचा व्यवसाय सुरु करू शकता. परंतु त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत, तसेच तुमच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका आता केंद्र सरकार तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज देईल.

असतात 4 प्रकारचे वितरक

सर्वात अगोदर तुम्हाला एलपीजी गॅस एजन्सीसाठी डिस्ट्रिब्युटरशिप घ्यावी लागेल. यात शहरी, ग्रामीण, ग्रामीण आणि हार्ड-टू-रिच क्षेत्रीय वितरक असे ४ प्रकार असतात. अर्ज करण्याअगोदर तुम्हाला एजन्सी कोठे स्थापन करायची आहे? ते क्षेत्र कोठे येते? याची तुम्हाला माहिती असावी. त्यासाठी परिसराचे सर्वेक्षण करून घेता येईल. या आधारे तुम्हाला एजन्सीचा परवाना मिळू शकतो.

अटी

गॅस एजन्सी सुरु करण्यासाठी तुमचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच अर्जदाराने मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी 10वी उत्तीर्ण असावी. त्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणत्याही तेल विपणन कंपनीचा कर्मचारी नसावा. अर्ज करण्यासाठी 10,000 रुपयांचे शुल्क आकारण्यात येईल. इतकेच नाही तर तुमच्याकडे 15 लाख रुपये गोदामे आणि एजन्सी कार्यालये बांधण्यासाठी असावेत.

कशी असते डिस्ट्रीब्युटरशिप प्रोसेस

आता तुम्हाला भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅसकडून वितरकपदासाठी अर्ज करावा लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या तिन्ही सरकारी कंपन्या असून या कंपन्या डिस्ट्रिब्युटरशिपचे वितरण करतात, त्यावेळी त्या वृत्तपत्रे आणि इतर माध्यमांतून त्यासाठी जाहिराती देत असतात. त्यामुळे जेव्हा या कंपन्या अधिसूचना जारी करतात त्यावेळी तुम्ही अर्ज दाखल करू शकता.

परवाना मिळवण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला https://www.lpgvitarakchayan.in/ वर स्वतःची नोंदणी करावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला प्रोफाइल बनवावे लागणार आहे. यासाठी कंपन्या अर्जदाराची मुलाखत घेते. आता मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही दिलेली माहिती तपासून सर्व प्रकारच्या चौकशीनंतर तुम्हाला एक पत्र देण्यात येते. हे लक्षात ठेवा की तुम्हाला ज्या कंपनीकडून डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची आहे त्या कंपनीमध्ये तुम्हाला सिक्युरिटी जमा करावी लागणार आहे. त्यानंतर तुमच्या नावावर गॅस एजन्सी देण्यात येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe