Business Idea: अमुल सोबत व्यवसाय करा आणि महिन्याला कमवा 2 लाख! वाचा कशी कराल व्यवसायाला सुरुवात व किती येईल खर्च?

Ajay Patil
Published:
business idea

Business Idea:- प्रत्येकाच्या मनामध्ये कुठलातरी व्यवसाय करावा आणि त्या माध्यमातून जीवनाची गाडी स्थिर करावी असा विचार असतो. नेमका व्यवसाय कोणता सुरू करावा आणि त्यासाठी नेमका किती खर्च येईल? याबाबत मात्र आपल्याला बऱ्याच जणांमध्ये गोंधळ दिसून येतो. कारण व्यवसायांचे अनेक प्रकार आहेत व त्याची एक भली मोठी यादी तयार होईल व यामधून नेमक्या कोणत्या व्यवसायाची सुरुवात करावी हे देखील पाहणे खूप गरजेचे असते.

या करिता तुम्हाला देखील एखादा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा मनामध्ये असेल तर तुम्ही दूध विक्री क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या अमूल सोबत स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात व अमुलची फ्रेंचायसी सुरू करू शकता.अमूलच्या माध्यमातून लोकांना त्यांची उत्पादन विकण्यासाठी स्टोर उघडण्याची परवानगी देण्यात येते.

त्यामध्ये तुम्ही या कंपनीची फ्रेंचाईजी घेऊन व्यवसाय उभा करू शकतात व महत्त्वाचे म्हणजे तुमच्या नफ्यामध्ये कंपनीला कुठल्याही प्रकारचा वाटा द्यावा लागत नाही. तसेच विक्रीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अमूल कमिशनवर पुरवते. म्हणजेच तुम्ही जितके जास्त मालाची विक्री कराल तितके तुम्हाला कमिशन जास्त मिळते. अमुलच्या माध्यमातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जाते व अशा पदार्थांना बाजारामध्ये नेहमी चांगली मागणी असल्यामुळे तुम्ही अमूल सोबत व्यवसाय करून महिन्याला चांगले उत्पन्न मिळवू शकतात.

अमूलची फ्रेंचाईझी कशी घ्याल?

तुम्हाला देखील अमूल सोबत व्यवसाय करायचा असेल तर या माध्यमातून तुम्ही या कंपनीच्या दोन प्रकारच्या फ्रेंचाईजी घेऊ शकतात. यामध्ये अमूल आउटलेट,अमुल रेल्वे पार्लर आणि अमोल कियोस्क एका फ्रेंचाईसी अंतर्गत येतात. तसेच तुम्हाला अमुल आईस्क्रीम स्कुपिंग पार्लर दुसऱ्या प्रकाराच्या फ्रॅंचाईजी अंतर्गत घेता येतो. या दोन्ही प्रकारच्या फ्रेंचायझीची किंमत वेगवेगळी आहे.

एवढेच नाही तर तुम्ही जे दुकान उभाराल त्याचा आकार आणि असलेले नियम देखील वेगवेगळे असतात. तुम्हाला जर अमूलचे आउटलेट घ्यायचे असेल तर तुमच्याकडे 150 स्क्वेअर फुट जागा आवश्यक असते तर आईस्क्रीम पार्लर करिता 300 चौरस फूट कमीत कमी जागा असावी.

 किती येतो अमुल आऊटलेट, रेल्वे पार्लर आणि किओस्कचा खर्च?

साधारणपणे तुम्हाला या तिन्ही प्रकारांसाठी दोन लाख रुपयांचा खर्च करावा लागतो. दोन लाखमध्ये ब्रँड सिक्युरिटी करिता 25 हजार रुपये, नूतनीकरणासाठी एक लाख रुपये आणि उपकरणांकरिता 70 हजार रुपयांचा यामध्ये समावेश होतो. एवढेच नाही तर या तीन आउटलेट करिता तुमचे दुकान हे शंभर ते दीडशे स्क्वेअर फुट आकाराचे असावे.

अमूल आईस्क्रीम स्कुपिंग पार्लरवर किती खर्च करावे लागेल?

तुम्हाला जर अमूल स्कुपिंग पार्लर उघडायचे असेल तर त्यावर तुम्हाला साधारणपणे सहा लाख रुपये खर्च येतो. यामध्ये पन्नास हजार सुरक्षा ठेव तसेच चार लाख नूतनीकरणासाठी खर्च व यंत्रसामग्री करीता दीड लाख रुपये भरणे गरजेचे असते.

 या व्यवसायातून किती कमाई करू शकता?

आपल्याला माहित आहे की अमूलच्या आउटलेट मधून मोठ्या प्रमाणावर उत्पादने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी असते. जर तुमचे आउटलेट बाजारातील एखाद्या चांगल्या लोकेशनवर असेल तर तुम्ही मासिक दोन ते तीन लाख रुपये देखील कमवू शकतात.

अशा परिस्थितीमध्ये कंपनीकडून जे काही कमिशन मिळते त्या माध्यमातून चांगली कमाई आपल्याला करता येते. कंपनीच्या माध्यमातून आऊटलेटमध्ये विक्रीकरिता जे दूध व दुग्धजन्य पदार्थ असतात त्यांच्या विक्रीवर अडीच ते दहा टक्क्यांपर्यंत कमिशन मिळते. तुम्हाला जर या संबंधीच्या अटी व शर्ती समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही  अमूलशी संपर्क साधू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe