Business Idea :- व्यवसायाची निवड करताना ती अगदी छोट्या पद्धतीने आणि कमीत कमी गुंतवणुकीत खूप चांगल्या प्रकारे आर्थिक प्राप्ती करून देऊ शकतील अशा व्यवसायांची निवड करणे गरजेचे आहे. उगीचच काहीतरी मोठा व्यवसाय सुरू करणे आणि त्याचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे जास्त गुंतवणूक करून देखील नुकसानीला सामोरे जावे लागते.त्यामुळे कमीत कमी गुंतवणुकीत आणि पुरेशी माहिती घेऊन छोटासा व्यवसाय सुरू केला आणि नंतर कालांतराने तो वाढवत जाने हे कधीही फायद्याचे असते.
त्यामुळे डोके लावून अशाच व्यवसायांची निवड करणे गरजेचे असते. व्यवसायांची यादी पाहिली तर यामध्ये असे अनेक व्यवसाय आहेत की ते तुम्ही अगदी घरी बसून आणि नाहीच्या बरोबर भांडवल गुंतवणूक करून सुरू करू शकतात. काही मध्ये तर तुम्हाला एक रुपया देखील भांडवल गुंतवण्याची गरज नसते.
तुमच्यातील अंगभूत असलेली कौशल्य तुम्हाला भरपूर असे पैसे मिळवून देतात. अगदी याच पद्धतीने आपण या लेखात तीन व्यवसायांची माहिती घेणार आहोत. तुम्हाला कमीत कमी भांडवलामध्ये किंवा शून्य भांडवलामध्ये देखील चांगला पैसा मिळवून देतील.
सुरू करा हे तीन व्यवसाय आणि कमवा लाखात
1- हेल्थ क्लबचा बिझनेस– आज कालचे आपण लोकांचे जीवन जगणे बघितले तर ते अत्यंत धावपळीचे आणि धकाधकीचे असे झाले आहे. लोकांना पुरेशी आरोग्याची काळजी घ्यायला देखील वेळ नाही. बऱ्याचदा लोक कोणत्या ना कोणत्या आजारांना बळी पडतात.
की हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हेल्थ क्लब उघडू शकतात. या क्लबच्या माध्यमातून तुम्ही योगाचे क्लासेस तसेच डान्स क्लास किंवा जिम यापैकी कोणताही एक व्यवसाय उघडू शकता. फक्त याकरिता तुम्हाला आरोग्य आणि फिटनेस या क्षेत्राचे चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे.
2- पेटीएम एजंट बनने किंवा पेटीएम एजंट व्यवसाय– तुम्हाला माहित आहे की भारतामध्ये ऑनलाईन माध्यमातून आता व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढले असून याकरिता लोक पेटीएम, फोन तसेच गुगल पे आणि भीम ॲप सारख्या एप्लीकेशनच्या माध्यमातून ऑनलाइन व्यवहार करतात. याच माध्यमातून तुम्ही पेटीएम एजंट बनून चांगली कमाई करू शकता.
एटीएम एजंट बनण्याकरता तुमचे वय किमान 18 वर्षे असणे गरजेचे आहे व तुमच्याकडे स्मार्टफोन असावा. तसेच कम्युनिकेशन स्किल अर्थात संभाषण कौशल्य देखील उत्तम असणे गरजेचे आहे.तुम्हाला देखील पेटीएम एजंट बनायचे असेल तर तुम्ही पेटीएमच्या पोर्टल वर जाऊन त्यासाठीची आवश्यक नोंदणी करू शकतात व फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला एक हजार रुपये फी भरणे गरजेचे आहे. आता तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते व नंतर तुम्ही पेटीएम एजंट व्हाल व त्या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकतात.
3- ट्रान्सलेटर अथवा भाषांतराचा व्यवसाय– भारताचा विचार केला तर भारतामध्ये अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. तसेच आपल्याकडील लोकांना देखील जगातील इतर देशांच्या भाषा शिकायचे असतात. याच अनुषंगाने ट्रान्सलेटर अर्थात अनुवादकाला त्यांचे शब्द दुसऱ्या भाषेत सांगावे लागतात आणि तुम्ही या बाबतीत देखील व्यवसाय डोळ्यासमोर ठेवून भाषांतराचे काम करू शकतात.
सध्या अनुवादकाचे काम खूप वाढले असून सरकारी पातळीवर देखील हिंदीत काम खूप वाढले आहे. पुढे बऱ्याचदा इंग्रजीतून हिंदीत भाषांतर करून अनेक पद्धतीची कामे केली जात आहेत. अनेक परदेशी भाषांमध्ये देखील भाषांतर करणे गरजेचे आहे. तुम्हाला जर काही भाषांच्या ज्ञान अवगत असेल तर तुम्ही भाषांतराचे काम सुरू करून देखील भरपूर पैसे कमवू शकता.