Business Success Story:- आपल्याला आयुष्यामध्ये असणारी एखादी आवड किंवा छंद जोपासत त्याचे व्यवसायामध्ये रूपांतर करणे आणि तो व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विकसित करून त्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कमावणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही.
परंतु जर समर्पण, ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द आणि चिकाटी, ध्येयाच्या मार्गावर चालताना कितीही वेळा पडण्याची वेळ आली तरी पडून परत उठणे व ध्येयाकडे वाटचाल करत राहणे इत्यादी गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात व तेव्हा कुठे व्यक्ती आयुष्यामध्ये यशस्वी होत असते.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण मीना बिंद्रा या यशस्वी उद्योजकेची यशोगाथा बघितली तर ती आपल्याला नक्कीच थक्क करेल अशी आहे. एकेकाळी गृहिणी असताना शिवणकाम करण्याचा छंद असणाऱ्या मीना बिंद्रा आज भारतातील बिबा नावाच्या टॉप एथनीक कपड्यांच्या ब्रँडच्या मालक आहेत. त्यांचा शिवणकामाच्या छदाचे रूपांतर त्यांनी व्यवसायात केले व आज कपड्यांच्या दुनियेमध्ये बिबाने स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे.
मीना बिंद्रा यांचे बालपण आणि आयुष्यातील प्रवास
मीना बिंद्रा यांचा जन्म दिल्लीत झाला व त्यांचे बालपण देखील दिल्लीतच गेले. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बघितले तर दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली व वयाच्या विसाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले.
लग्न झाल्यानंतर घरकाम सांभाळत त्यांनी त्यांच्या संजय आणि सिद्धार्थ या दोन मुलांचे व्यवस्थित संगोपन केले. जेव्हा मीना बिंद्रा या वयाच्या 40 वर्षाच्या झाल्या व या कालावधीपर्यंत त्यांची दोन्ही मुले देखील बऱ्यापैकी मोठी झालेली होती.
तेव्हा मात्र आता काहीतरी व्यवसाय करावा व आपल्या शिवणकामाच्या आवडीचे रूपांतर व्यवसायात करावे या उद्देशाने त्यांनी घरूनच सिम्पल कॉटन प्रिंटेड सूट विकायला सुरुवात केली.
कुठल्याही प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण नसताना व कुठलीही जास्तीची माहिती नसताना त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. पुढे त्यांनी 1983 यावर्षी भावाच्या रिकाम्या असलेल्या फ्लॅटमध्ये अशा प्रकारच्या सूटचे प्रदर्शन भरवले व त्या प्रदर्शनात त्यांनी स्वतः शिवलेले सूट मोठ्या प्रमाणावर विकले. जवळपास या प्रदर्शनामध्ये त्यांना चांगले यश मिळाले.
अशाप्रकारे केली बिबाची सुरुवात
प्रदर्शनात मिळालेल्या यशानंतर मात्र व्यवसायात वाढ करावी असे त्यांनी ठरवले व यामध्ये त्यांच्या पतीने देखील त्यांना मदत केली. भांडवल म्हणून बँकेकडून त्यांनी आठ हजार रुपयांचे कर्ज घेतले व व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला साधे सूट बनवले व त्यावर ब्लॉक प्रिंटिंग होते.
मीना यांनी त्यांच्या गुंतवणुकीचा अर्धा ही खर्च केला न होता तेव्हा तिचे बहुतेक सूट प्रदर्शनात विकले गेले आणि तिचे पैसे जवळ जवळ दुप्पट झाले. हळूहळू मीना यांना मुंबईतील मोठ्या कपड्यांच्या स्टोअर्स मधून ऑर्डर मिळायला लागल्या.
हे स्टोअर्स असे होते की ते चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध होते व त्यांचे सूट सर्वत्र होते आणि याच योग्य कारणामुळे मीना बिंद्रा चर्चेत आल्या.अशाप्रकारे व्यवसायात वाढ करत असताना त्यांनी त्यांच्या या सूटस आणि कपड्यांच्या ब्रांडला बिबा हे नाव दिले. हा ब्रँड खूप प्रसिद्ध होत असताना त्यांना बॉलीवूड मध्ये पहिले काम मिळाले.
जेव्हा किशोर बियाणी यांनी ना तुम जानो ना हम चित्रपटात भागीदारीसाठी त्यांच्याशी संपर्क साधला. यानंतर मात्र मीना बिंद्रा यांनी मागे वळून पाहिले नाही. आज भारतामध्ये बिबा ब्रँडचे तीनशे पेक्षा जास्त ब्रँड आउटलेट्स आणि 275 मल्टी ब्रँड आऊटलेट्स आहेत व एकूण महसूल 800 कोटींपेक्षा जास्त आहे.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले
2015 मध्ये मीना बिंद्रा यांना भारतीय वस्त्र उत्पादक संघटना द्वारे बिबा आणि देशाच्या वंशिक परिधान उद्योगातील योगदानाबद्दल सर्वांचे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एवढेच नाही तर 2012 मध्ये बिबाला इमेजेस अवार्ड्समध्ये बेस्ट एथनिक वेअर ब्रँड फॉर वुमन ही पदवी देखील देण्यात आली. आज बिबा ब्रांडने ई-कॉमर्स पोर्टल देखील सुरू केले आहे व डिजिटल युगात देखील प्रवास केला आहे. त्या माध्यमातून ग्राहकांना संपूर्ण देशभरात त्यांची उत्पादने खरेदी करता येऊ शकतात.