Business Success Story: आईकडून 10 हजार रुपये घेऊन केली व्यवसायाची सुरुवात! आज 32 हजार कोटींचे आहे मार्केट कॅप

Ajay Patil
Published:
ravi modi

Business Success Story:- कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही अगदी छोट्याशा प्रमाणात करणे खूप गरजेचे असते आणि कालांतराने कालबद्ध नियोजन आणि कष्ट, सातत्याच्या जोरावर या इवल्याश्या गोष्टीचे रूपांतर मोठ्या वटवृक्षात होते. परंतु या दरम्यानचा जो काही कालावधी असतो तो प्रचंड प्रमाणात कष्ट आणि संघर्षांनी व्यापलेला असतो.

जर आपण भारतातील अनेक प्रसिद्ध व्यावसायिकांचा विचार केला तर त्यांची सुरुवात अगदी छोट्याशा प्रमाणामध्ये झाली व कालांतराने आज भारतातच नव्हे तर जगामध्ये अशा व्यक्तीच्या व्यवसायांचे नाव प्रसिद्ध आहे. यामध्ये आपल्याला धीरूभाई अंबानी यांचे उदाहरण प्रामुख्याने घेता येईल.

अगदी याच मुद्द्याला साजेसे असेच एक उदाहरण घ्यायचे झाले तर पारंपारिक कपड्यांचा प्रसिद्ध ब्रँड असलेल्या मन्यावरचे संस्थापक आणि एमडी रवी मोदी यांचे घेता येईल. जर आपण मागच्या वर्षीच्या आयआयएफएल हूरून इंडिया रीच लिस्ट 2022 चा विचार केला तर रवी मोदी हे सर्वात जलद कमाई करणारे उद्योगपती म्हणून श्रीमंताची यादीमध्ये त्यांनी प्रवेश मिळवला आहे. रवी मोदींनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात कशी केली व आज एवढ्या मोठ्या यशापर्यंत कसे पोहोचले? यासंबंधीचीच माहिती या लेखात घेणार आहोत.

 रवी मोदी यांची यशोगाथा

रवी मोदींचे एकंदरीत जीवनाची सुरुवात पाहिली तर ती कोलकत्ता पासून होते. कोलकत्ता या ठिकाणी त्यांच्या वडिलांचे एक छोटेसे कपड्यांचे दुकान होते. या दुकानांमध्ये ते प्रत्येक कामात त्यांच्या वडिलांना मदत करायचे. साधारणपणे खेळण्याबागडण्याच्या वयापासून ते नियमितपणे दुकानांमध्ये काम करत होते.

यामध्ये नऊ वर्षे त्यांनी नियमितपणे दुकानांमध्ये काम केले आणि या कालावधीमध्ये त्यांनी या व्यवसायातील सगळी गुंतागुंत आणि खाचखळगे समजून घेतली. नंतरच्या काळामध्ये त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेज कोलकत्ता या ठिकाणाहून बी.कॉमची पद्धत मिळवली व पुढे एमबीए करण्याचा विचार केला. परंतु या कालावधीतच त्यांच्या वडिलांनी त्यांना एक बहुमोल सल्ला दिला व म्हटले की गेल्या नऊ वर्षांमध्ये दुकानात तु जे काही काम केले त्यामध्ये तुझे खरे एमबीए पूर्ण झाले आहे.

त्यानंतर त्यांनी वडिलांच्या दुकानांमध्येच सेल्समन म्हणून कामाला सुरुवात केली. हे काम करत असताना काही गोष्टींवर वडिलांशी त्यांचे खटकले व स्वतः काहीतरी करावे या उद्देशाने त्यांनी आईकडून दहा हजार रुपये घेतले व वेदांत फॅशन कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. अशाप्रकारे त्यांनी व्यवसायाची पायाभरणी केली.

 दहा हजार रुपयात उभारला कोट्यावधींचा व्यवसाय

रवी मोदी यांनी नंतर वेदांताच्या माध्यमातून भारतीय वांशिक पोशाख बनवायला सुरुवात केली व कोलकत्ताच नाही तर पश्चिम बंगालमधील इतर महत्त्वाचे शहरे व त्यासोबतच उत्तर प्रदेश,बिहार, ओडिषा व मध्य प्रदेश राज्यात देखील विक्री वाढवायला सुरुवात केली. त्यांनी जे काही कपडे बनवलेले होते त्यांचा दर्जा उत्तम होता व डिझाईन देखील लोकांना आवडेल अशीच असल्याने लोकांमध्ये अल्पावधीतच हे कपडे प्रसिद्ध झाले.

त्यानंतर रवी मोदी यांनी त्यांच्या कपड्यांच्या उत्पादनांना मान्यवर असे नाव दिले. एवढेच नाही तर त्यांनी यादरम्यान विशाल मेगा मार्ट आणि पेंटालुन सारख्या मोठ्या दुकानादेखील तगडी टक्कर दिली. या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी भुवनेश्वर,ओडीसा या ठिकाणी त्यांच्या वेदांत फॅशनचे पहिले स्टोर उघडले.

आज जर आपण पाहिले तर संपूर्ण देशात वेदांत फॅशनचे जवळपास 600 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. 2016 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली त्यांच्या वेदांत कंपनीचा ब्रँड ॲम्बेसिडर बनला व त्यानंतर मात्र मान्यावर ब्रांडने कधीच मागे वळून पाहिले नाही.

एवढेच नाही तर त्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माला देखील त्यांनी सोबत घेतले व महिला ब्रँड मोहे बाजारामध्ये लॉन्च केला. महिलांच्या बरोबरीनेच उच्च मध्यमवर्गाकरिता  Tvamev ब्रँड आणि खालच्या वर्गाकरिता मंथन ब्रँड त्यांनी लॉन्च केला. मागच्याच वर्षी त्यांनी आता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांना देखील ब्रँड अँबेसिडर म्हणून त्यांच्यासोबत घेतले आहे.

 सध्या किती आहे कंपनीचे मार्केट कॅप?

गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये त्यांची कंपनी शेअर बाजारामध्ये लिस्टेड झाली व या कंपनीच्या मार्केट कॅप म्हणजेच बाजार भांडवल आजमीतिला तब्बल 32354.40 कोटी रुपयांच्या घरात आहे.

अशा पद्धतीने कष्ट आणि सातत्याच्या जोरावर अल्पशा भांडवलावर उभा केलेला त्यांचा व्यवसाय हाच मोठ्या प्रमाणावर यशाची भरारी घेत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe