Business Success Story: कोण आहेत मुरलीधर ज्ञानचंदानी? शून्यातून उभा केला घडी डिटर्जंटचा ब्रँड, आज आहे एकूण संपत्ती 20 हजार कोटी

Ajay Patil
Published:
murlidhar dnyanchandani

Business Success Story:- भारतामध्ये आपल्याला असे अनेक उद्योजक दिसून येतात की त्यांची उद्योग उभारणीपासूनची यशोगाथा पाहिली तर ती मनाला अचंबित करते. अगदी शून्यातून सुरुवात केलेली असते व अखंड मेहनत करून आज त्यांचा व्यवसाय काही हजार कोटीपर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसून येतो.

परंतु मध्यंतरीच्या कालावधीचा त्यांचा जो काही प्रवास असतो तो साधा सोपा नसतो. या प्रवासामध्ये असंख्य अडचणी तसेच कित्येक वेळा अपयशी होण्याचे प्रसंग देखील उद्भवतात. परंतु अपयश पचवून परत त्याच नव्या उमेदीने सुरुवात करून यशाच्या दिशेने मार्गक्रमण असे उद्योजक करत राहतात व यशस्वी होतात.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथील ज्ञानचंदानी बंधूंचा विचार केला तर तो काहीसा असाच आहे.  शून्यातून उभं केलेले त्यांनी त्यांचे विश्व आज तब्बल 20000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचवले आहे.

विशेष म्हणजे मुरलीधर ज्ञानचंदानी हे उत्तर प्रदेश राज्यातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात व त्यांच्याकडे एकूण 12000 कोटींची संपत्ती आहे. आपल्याला माहित असलेला घडी डिटर्जंट आणि साबण बनवणाऱ्या आरएसपीएल ग्रुपचे ते चेअरमन आहेत. त्यांच्या या घडी डिटर्जंटचे ब्रँड अँबेसिडर महानायक अमिताभ बच्चन आहेत.

 मुरलीधर ज्ञानचंदानी यांचा शून्यातून कोट्यावधीपर्यंतचा प्रवास

मुरलीधर ज्ञानचंदानी हे उत्तर प्रदेश राज्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात व त्यांच्या आरएसपीएल नावाच्या कंपनीच्या माध्यमातून घडी डिटर्जंट पावडरची निर्मिती केली जाते. मुरलीधर यांचे लहान भाऊ विमलकुमार मूलचंदानी यांचे देखील मोलाचे सहकार्य त्यांना हा व्यवसाय वाढवण्यामध्ये झालेले आहे.

राहणारी मूळचे कानपूरचे असून अगोदर त्यांचे वडील दयालदास ज्ञानचंदानी ग्लिसरीनचा वापर करून साबण तयार करायचे. परंतु वडिलांचा हा व्यवसाय दोघे मुलांनी हातात घेतला व आज या यशापर्यंत पोहोचवला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असलेले घडी डिटर्जंट हे उत्पादन आज भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या घराघरात असून भारतातल्या टॉपच्या डिटर्जंट ब्रँडमध्ये घडीचा नंबर दुसरा लागतो.

जर आपण कित्येक वर्षापासून पाहिले तर घडी डिटर्जंटच्या किमती कमी असल्यामुळे भारतीयांमध्ये घडी डिटर्जंट प्रसिद्ध आहे. सध्या हा त्यांचा व्यवसाय दोघ ही भावांची मुलं सांभाळत असून ते विविध पदांवर या कंपनीत काम करत आहेत.

 मुरलीधर ज्ञानचंदानी यांची आहे रेडचीफ कंपनी

रेडचीप ही कंपनी आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे. या कंपनीचे शूज खूप ब्रॅण्डेड असून बरेच जण या रेडचीफ कंपनीचे शूज वापरतात. ही कंपनी शूज व्यतिरिक्त जॅकेट तसेच शर्ट, जीन्स आणि बेल्ट देखील तयार करते व त्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर करते. या कंपनीचे जे काही ब्रँड आहेत ते जागतिक स्तरावर देखील खूप प्रसिद्ध आहेत.

यासोबतच सामाजिक कार्यामध्ये देखील ज्ञानचंदानी बंधू पुढे असून त्यांनी कानपूर मध्ये एक चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू केले आहे व यावर हजार रुग्णांवर उपचार केला जातो. महागडे वैद्यकीय उपचार ज्या रुग्णांना परवडतं नाहीत अशा तरुणांसाठी यांचे चारिटेबल हॉस्पिटल खूप मोठा आधार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe