Business Success Story: लोकांच्या घरी जेवण पोहोचवून उभारली 2 हजार कोटींची कंपनी! वाचा कसे झाले शक्य?

Ajay Patil
Published:

Business Success Story:- असे म्हणतात की माणसाकडे जर कल्पना राहिली व त्या कल्पनेचे रूपांतर जर कल्पकतेने जर व्यवसायामध्ये केले तर नक्कीच त्यामधून खूप मोठा व्यवसाय उभा राहतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून उभा राहिलेला व्यवसाय कालांतराने काही कोटींच्या घरात पोहोचण्याची अनेक उदाहरणे आपल्याला भारतातच सापडतील.

फक्त याकरिता माणसांमध्ये हवे असते ती कल्पकता व त्या कल्पकतेला किंवा कल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी लागणारे कष्ट आणि जिद्द इत्यादी गुण खूप महत्त्वाचे असतात. या गुणांच्या आधारे जर एखाद्याने प्रयत्न केले तर नक्कीच व्यक्ती यशस्वी होऊ शकतो हे मात्र निश्चित.

याच मुद्द्याला धरून जर आपण झोमॅटोचे दिपंदर गोयल यांची यशोगाथा पाहिली तर त्यांना स्वतःला एकेकाळी अन्नासाठी रांगेत उभे राहावे लागत होते मात्र तेच दिपेंदर आज लोकांच्या घरी अन्न पोहोचवून कोटी रुपये कमवत आहेत. या लेखात आपण झोमॅटोचे दीपंदर गोयल यांची यशोगाथा पाहणार आहोत.

 झोमॅटोचे दीपंदर गोयल यांची यशोगाथा

जर आपण दिपंदर गोयल यांचा भूतकाळ पाहिला तर ते एका कार्यालयामध्ये जेव्हा काम करायचे तेव्हा जेवणाच्या वेळेमध्ये त्यांना कॅफेटेरियामध्ये जावे लागायचे व त्या ठिकाणी भरपूर गर्दी असायची. त्या ठिकाणी मेनू काय आहे हे बघण्याकरिता कर्मचाऱ्यांची खूप लांब रांगा असायची.

या सगळ्या प्रक्रियेमध्ये वेळ तर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च व्हायचाच परंतु योग्य आहार मिळेल याची देखील शाश्वती नसायची. ही सगळी परिस्थिती पाहून दीपंदर यांना एक नामी कल्पना सुचली व त्यांनी ऑफिसच्या या कॅफेटेरियाचा मेनू स्कॅन केला व तो स्कॅन करून स्वतःची वेबसाईट तयार करून त्यावर पोस्ट टाकली.

जेव्हा तेथील मेनू ऑनलाईन झाला तेव्हा त्यावर मोठ्या प्रमाणावर हिट्स वाढू लागल्या. त्यामुळे दिपंदर यांना यातून खूप मोठ्या प्रमाणावर प्रेरणा मिळाली व त्यातून प्रोत्साहन घेऊन काहीतरी चांगले करण्याचा या माध्यमातून विचार केला. या सगळ्या माध्यमातून त्यांना एक वेबसाईट तयार करायचे होती

या वेबसाईटच्या माध्यमातून दिल्लीतील लोकांना दिल्लीतील सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंटची माहिती अगदी घरबसल्या मिळू शकेल असा त्यांचा प्रयत्न होता. पुढे त्यांनी त्यांचा मित्र प्रसून जैन यांच्यासोबत फूडलेट नावाचा एक उपक्रम सुरू केला. परंतु काही कारणाने त्यांचा मित्र प्रसून जैन मुंबईला गेले आणि त्यानंतर मात्र फुडलेट चालवणामध्ये अडचणी निर्माण झाल्या.

त्यानंतर फूडबे तयार करण्यात आले व त्यावर संपूर्ण देशातील दोन हजार रेस्टॉरंटची यादी टाकण्यात आली. या सगळ्या प्रयत्नांचे रूपांतर व्यवसायात करण्यासाठी या गोष्टींकडे सतत लक्ष देणे गरजेचे होते व त्यामध्येच त्यांनी 2010 मध्ये या फूडबेचे नामकरण झोमॅटो असे केले.

 झोमॅटोचे व्यवसायाचे स्वरूप कसे आहे?

झोमॅटो चे कमाईचे अनेक मार्ग आहेत. यामध्येच रेस्टॉरंट जाहिरात हे माध्यम कमाईचे महत्त्वाचे असून कंपनी आपल्या अँप वर रेस्टॉरंटची दृश्यमानता वाढवण्यासाठी पैसे आकारते. तसेच या एप्लीकेशनवर जाहिराती देखील चालवले जातात व त्यामधून सुमारे 75 टक्के उत्पन्न झोमॅटोला मिळते.

तसेच दुसरे म्हणजे वितरण शुल्क हा देखील त्यांचा एक कमाईचा मार्ग असून ग्राहकांच्या माध्यमातून झोमॅटो डिलिव्हरी शुल्क देखील घेते. हे शुल्क डिलिव्हरीचे काम करणारे व्यक्ती आणि कंपनी यांच्यामध्ये विभागले जाते. यात महत्त्वाचे म्हणजे कंपनीच्या माध्यमातून इव्हेंट जाहिरातीतून देखील चांगली कमाई करते.

कंपनीशी संबंधित रेस्टॉरंटकरिता आणि कार्यक्रम देखील झोमॅटोकडून आयोजित केले जातात त्या माध्यमातून देखील काही रक्कम झोमॅटोला मिळते. तसेच झोमॅटो कडून काही खास सुविधा मिळवण्याकरिता झोमॅटो गोल्ड सारखे लॉयल्टी प्रोग्राम देखील राबवले जातात.

एवढेच नाही तर सल्ला सेवा हा देखील कंपनीचा एक आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. समजा एखाद्या रेस्टॉरंटला नवीन शाखा उघडायचे असेल तर त्यासंबंधी सल्ला आवश्यक असतो व तेव्हा त्यांना कंपनीच्या माध्यमातून सल्ला देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जाते व त्याबद्दल देखील झोमॅटोला पैसे मिळतात.

 झोमॅटोची आर्थिक कामगिरी कशी आहे?

जर आपण सप्टेंबर 2023 च्या तीमाहीचा विचार केला तर कंपनीला दोनशे कोटी रुपयांचा नफा झाला होता व साधारणपणे मागच्या वर्षाच्या तिमाहीत मात्र कंपनीला 186 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. 947 कोटी रुपयांच्या एका डीलमध्ये सॉफ्ट बँकेला शंभर कोटी रुपयांचा नफा झाला.

त्यामुळे असे बोलले जात आहे की सॉफ्टबँक येणाऱ्या काही दिवसांमध्ये झोमॅटो मधील राहिलेले स्टेक देखील विकण्याची शक्यता आहे. आज जर आपण झोमॅटोचे मार्केट व्हॅल्युएशन म्हणजेच बाजार मूल्य पाहिले तर ते दोन हजार कोटी रुपयांच्या वर आहे.

अशा प्रकारे एका छोट्याशा कल्पनेतून दिपंदर गोयल यांनी दोन हजार कोटी रुपयांपर्यंत झोमॅटो पोहोचवली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe