7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार ‘ही’ अनोखी भेट! कर्मचारी होणार मालामाल? वाचा माहिती

Ajay Patil
Published:
goverment employees

7th Pay Commission:- देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांची प्रतीक्षा वाढत जात असून त्यामागील प्रमुख कारण म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून अजून पर्यंत प्रलंबित असलेली महागाई भत्त्याची थकबाकी विषयी कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.

कारण आपण अनेक मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून ऐकले किंवा वाचले असेल की, सरकारच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या अगोदर कर्मचाऱ्यांना खुश करण्याच्या उद्दिष्टाने कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये महागाई भत्ता थकबाकीचे पैसे जमा करू शकते अशा स्वरूपाची साधारणपणे चर्चा होती.

परंतु तसे होताना मात्र दिसत नाहीये. कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून देखील अनेक दिवसांपासून थकबाकीबाबत मागणी करण्यात येत आहे. परंतु त्याला आतापर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली नाही.

अधिकृतपणे सरकारच्या माध्यमातून काहीही सांगण्यात आलेले नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात येत आहे की केंद्रातील मोदी सरकार लवकरच याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

 केंद्र सरकार लवकरात लवकर निर्णय घेण्याची शक्यता

केंद्र सरकार याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ शकते. कारण महागाई भत्त्याची ही 18 महिन्याची थकबाकी असून केंद्र सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला तर कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही 18 महिन्याची थकबाकीची रक्कम जमा होऊ शकते व ही एक कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट असेल.

या माध्यमातून जे कर्मचारी उच्चस्तरीय आहेत त्यांच्या खात्यामध्ये तब्बल दोन लाख 18 हजार रुपये पर्यंतचे रक्कम येऊ शकते. याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेतला तर देशातील एक कोटींपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना व निवृत्तीवेतनधारकांना याचा फायदा होणार आहे.

साधारणपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून कोरोना कालावधीतील दीड वर्षाची महागाई भत्ता थकबाकी असून ती रक्कम अजून पर्यंत पाठवण्यात आलेली नाही. तेव्हापासून कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या माध्यमातून  याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत आहे व ती आता मंजूर केली जाईल अशी साधारणपणे अपेक्षा आहे. परंतु याबाबत अजूनपर्यंत तरी कुठल्याही प्रकारचे अधिकृतपणे काही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

 कर्मचाऱ्यांना मिळत आहे 50 टक्के महागाई भत्ता

गेल्या काही दिवसा अगोदर केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचारी व पेन्शनधारकांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली होती व त्या वाढीनंतर महागाई भत्ता हा 50 टक्के झाला आहे. हा महागाई भत्ता लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये चांगली वाढ होणार आहे.

आपल्याला माहित आहेच की, सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार दरवर्षी दोनदा महागाई भत्ता वाढवते. ज्याचे दर एक जानेवारी आणि एक जुलैपासून प्रभावीपणे लागू केले जातात. आता वाढलेले तर हे एक जानेवारीपासून लागू केले जातील व त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना नक्कीच फायदा होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe