सध्या दसरा आणि दिवाळी सारखे महत्त्वाचे सण येऊ घातले असून सगळीकडे प्रसन्नमय असं वातावरण झालेले आहे. याच उत्साहाच्या आणि प्रसन्न वातावरणामध्ये केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून महागाई भत्ता तसेच महागाई सवलत इत्यादी बाबत महत्त्वाचा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या कित्येक दिवसापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाईभत्ता वाढीची प्रतीक्षा असून केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता वाढीस मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. आपल्याला माहित आहेच की, सध्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के इतका महागाई भत्ता मिळत असून यामध्ये चार टक्क्यांची वाढ सगळ्यांना अपेक्षित आहे
व जर चार टक्क्यांची वाढ केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली तर 46 टक्के महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महत्वाचे म्हणजे ही महागाई भत्तातील वाढ एक जुलै 2023 पासून सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होईल. तसेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जो काही महागाई भत्त्यातील फरकाची थकबाकी आहे ती देखील दिली जाण्याची शक्यता आहे.
महागाई भत्यात 4.24 टक्क्यांची वाढ
एआयसीपीआय- आयडब्ल्यूची गेल्या बारा महिन्यांची जर सरासरी पाहिली तर ती 382.32 इतकी आहे. जर यामध्ये सुत्राचा विचार केला तर एकूण महागाई भत्ता 46.24% इतका असेल. परंतु सध्याचा महागाई भत्ता दर 42 टक्के आहे. अशा परिस्थितीमध्ये एक जुलै 2023 पासून महागाई भत्त्यामध्ये 46.24%- 42%= 4.24% ची वाढ होईल.
परंतु जर आपण पाहिले तर महागाई भत्ता हा दशांशमध्ये मोजला जात नाही किंवा दिला जात नाही. म्हणजेच चार टक्के महागाई भत्ता वाढ होईल किंवा 4% वाढीसह तो दिला जाईल अशी शक्यता आहे. या वाढीचा फायदा हा एक कोटींपेक्षा जास्ती केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे.
ऑक्टोबरच्या पगारात मिळू शकतात हे लाभ?
सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून वेतन आणि इतर भत्ते मिळणाऱ्या केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलत इत्यादीचे पेमेंट हे ऑक्टोबरच्या अखेरीस केले जाण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबरच्या पगारांमध्ये हे वाढीव भत्ते जोडले जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एवढेच नाही तर या पेमेंटला तीन महिन्यांची थकबाकी देखील जोडल्यानंतर पेमेंट केले जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये चार टक्क्यांचे अतिरिक्त पेमेंट जोडले जाईल आणि ऑक्टोबर अखेरीस ते दिले जाईल अशी देखील दाट शक्यता आहे.