उद्योजक होण्यासाठी बँकेकडून कर्ज आणि अनुदान मिळवा! शासनाच्या या योजनेचा लाभ घ्या

Ajay Patil
Published:
cm rojgaar yojana

सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजना समाजातील विविध घटकांकरिता तसेच उद्योग उभारणी करिता पात्र लाभार्थ्यांना अनुदान स्वरूपात किंवा थेट आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून राबवल्या जातात. अशा अनेक लाभाच्या योजनांचा फायदा नागरिकांना होत असतो व बरेच नागरिक या माध्यमातून समृद्ध जीवन जगण्याकडे वाटचाल करतात. सरकारच्या योजनांचा विचार केला तर काही योजना या केंद्र सरकारच्या माध्यमातून तर काही राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात.

अशा योजनांमध्ये जर आपण स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी असलेल्या योजना पाहिला तर त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण अगोदरच देशांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे रोजगाराची साधने निर्माण होणे गरजेचे आहे. परंतु याकरिता सगळ्यात अगोदर लागतो तो पैसा. त्यामुळे अनेक योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येते व  गरजूंना उद्योग व्यवसाय उभारणीमध्ये हातभार लावण्यासाठी अशा योजनांचा खूप मोठा फायदा होत असतो.

देशातील किंवा राज्यातील तरुण-तरुणींना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे याकरिता महाराष्ट्र राज्य शासनाची मुख्यमंत्री रोजगार योजना ही खूप महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील जे काही पात्र  व्यक्ती आहेत त्यांना आत्मनिर्भर बनवणे व स्वतःचा रोजगार निर्माण करता यावा या दृष्टीकोनातून स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक मदतीतून उभे राहावेत याकरिता ही योजना राबवली जात आहे.

मुख्यमंत्री रोजगार योजना ही महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या अंतर्गत येणारे जे काही उद्योग संचालनालय मुंबई आहे यांच्यामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. तसेच सहयोगी संस्था म्हणून या योजनेअंतर्गत नोडल बँका तसेच उद्योजकीय प्रशिक्षण संस्था, अंमलबजावणी संस्था तसेच ऑनलाइन प्रक्रिये करिता असलेल्या सहाय्यभूत संस्था तसेच बँका आणि केंद्र शासनाच्या संस्था यांचे साहाय्य घेण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून जे कर्जाचे प्रस्ताव मंजूर केले जातात अशा मंजूर प्रकरणांमध्ये जे काही लाभार्थी असतात त्यांना दोन आठवडे कालावधीचे निवासी उद्योजकीय प्रशिक्षण घेणे बंधनकारक असते.

 मुख्यमंत्री रोजगार योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा

यामध्ये ज्या स्थानिक रहिवाशांना कुठल्याही प्रकारचे कायम उत्पन्नाचा स्त्रोत नाही असे 18 वर्षे पूर्ण झालेले व 45 वर्षाच्या आत असलेले रहिवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. तसेच इतर जाती व ज्या काही आरक्षित कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी वयामध्ये पाच वर्ष शिथिलता देण्यात आली आहे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

यामध्ये जर दहा लाखावरील प्रकल्पाकरिता कर्ज मिळवायचे असेल तर शैक्षणिक पात्रता ही सातवी उत्तीर्ण असावी व 25 लाखांवरील प्रकल्प असेल तर शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच एका कुटुंबातील एका व्यक्तीलाच या योजनेचा लाभ घेता येतो. तसेच या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार व्यक्तीने याआधी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम किंवा केंद्र  तसेच राज्य सरकारच्या अन्य विभागाकडे अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

 या योजनेचा फायदा कसा मिळतो?

या योजनेच्या माध्यमातून बँकेकडून 60 ते 75% पर्यंत कर्ज मिळते व संबंधित प्रकल्पाकरिता अर्जदाराने स्वतःच्या हिश्याचे पाच टक्के ते 10 टक्क्यांपर्यंत भांडवल गुंतवणे गरजेचे आहे. शासनाच्या आर्थिक सहाय्य अनुदान स्वरूपात म्हणजेच मार्जिन मनी हे 15% ते 35% पर्यंत असते.

यामध्ये साधारणपणे जर आपण प्रवर्गनिहाय विचार केला तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती / महिला/ अपंग तसेच माजी सैनिक यांना देय अनुदान म्हणजेच मार्जिन मनी हा शहरी भागाकरिता 25% तर बँकेचे कर्ज सत्तर टक्के इतके मिळते व पाच टक्के स्वतःला गुंतवणूक करावी लागते.

तसेच ग्रामीण भागाकरिता मार्जिन मनी म्हणून पस्तीस टक्के अनुदान मिळते तर बँकेचे कर्ज 60 टक्के मिळते व स्वतःला पाच टक्के एवढी गुंतवणूक करावी लागते. त्यासोबतच उर्वरित प्रवर्गाकरिता शहरी भागाकरिता मार्जिन मनी अर्थात देय अनुदान 15 टक्के मिळते तर बँकेचे कर्ज 75 टक्के मिळते व अर्जदाराला स्वतःची गुंतवणूक 10% करणे गरजेचे असते. तसेच ग्रामीण भागाकरिता देय अनुदान अर्थात मार्जिन मनी 25% मिळते व बँकेचे कर्ज 65 टक्के मिळते व स्वतःची गुंतवणूक दहा टक्के करणे गरजेचे असते.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा?

1- तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे असते व अर्ज करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला CMEGP अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

2- त्यानंतर या ठिकाणी असलेल्या होम पेजवर ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म फॉर इंडिव्हिज्युअल या पर्यावर क्लिक करावे लागेल.

3- त्यानंतर पुढच्या पेजवर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायचे आहे.

4- माहिती भरून झाल्यावर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे व ही कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचे आहे.

5- अशा पद्धतीने तुमचे अर्ज हा पूर्ण होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe