Coin Of Shri Rama:- सध्या संपूर्ण देशामध्ये 22 जानेवारी रोजी आयोध्याला होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे एक भक्तिमय वातावरण तयार झाले असून संपूर्ण भारतात राममय वातावरण तयार झाले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. संपूर्ण देशामध्ये रामाचे फोटो तसेच इतर महत्त्वाच्या गोष्टींना खूप मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याचे सध्या चित्र आहे.
या सगळ्या भक्तिमय वातावरणामध्ये ऑगमॉन्ट गोल्ड फॉर ऑलने ओळख जपली असून त्यांनी सध्या श्रीराम मंदिर कॉईन किट अयोध्यातील राम मंदिराच्या नवनिर्माणासाठी समर्पित केले आहे. विशेष म्हणजे या कीटची निर्मिती वैशिष्ट्येपूर्ण रीतीने करण्यात आलेली असून यामध्ये अप्रतिमपणे चौरंग साकारलेला आहे

तसेच कलात्मक पद्धतीने राम मंदिराची प्रतिकृती व राम मंदिराच्या निर्माणासाठी जी काही माती एकत्र करण्यात आलेली आहे तिचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. ग्राहकांना जर ही किट खरेदी करायची असेल तर ते ऑगमॉन्ट गोल्ड फॉर ऑल ची वेबसाईट किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून खरेदी करू शकतात. इतकेच नव्हे तर ही सुविधा लोकांकरिता घरपोच देण्याच्या स्वरूपात देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
किती आहे या किटची किंमत?
ही जी काही संपूर्ण किट आहे त्याचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे नाणे असून ते विशेष स्वरूपात तयार करण्यात आलेला आहे. श्रीराम मंदिर कॉइन कीट ही सात ग्रॅम शुद्ध सोन्यापासून तयार करण्यात आलेली असून तिची किंमत 55 हजार रुपये आहे. यासाठी एक विशेष ऑफर असून या अंतर्गत तुम्ही ती 52,751 रुपयाला खरेदी करू शकणार आहात. तसेच या सोबत दोन हजार रुपये किमतीचा डिजिटल कॉइन देखील मोफत मिळणार आहे.
तसेच चांदीची नाणी घ्यायची असतील ते श्रीराम मंदिराशी संबंधित असलेली दहा ग्रॅम, वीस ग्रॅम तसेच 50 आणि 100 ग्रॅम चांदीची नाणी देखील खरेदी करू शकणार आहेत. ऑगमॉन्ट गोल्ड फॉर ऑलच्या माध्यमातून ही किट उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले असून श्री रामलल्ला प्रतिष्ठापना कार्यक्रमाप्रसंगी ते सर्व लोकांना स्वस्तात सहजपणे खरेदी करता येऊ शकेल.
ही कीट एक विशिष्ट पद्धतीने निर्माण करण्यात आलेली असून या गोल्ड कॉइन कीटच्या माध्यमातून श्रीराम मंदिराच्या भव्यतेचा भाग होतो. तसेच या किटच्या निर्माणाकरिता केलेली सूक्ष्म कामगिरी, ज्ञान तसेच समृद्धी, यश आणि उत्तम भाग्याचे प्रतीक आहे. यामध्ये जे काही सोन्याचे नाणे आहेत ते 24 कॅरेट मध्ये 999 शुद्धतेसह तयार करण्यात आलेले आहे.
याचे पॅकेजिंग टेम्पर प्रूफ असून ते वजनाने हलके आहे व तुम्हाला घरपोच मिळण्याची व्यवस्था देखील यासाठी केली जात आहे. या नाण्यांमध्ये साधेपणा तसेच समृद्धी आणि भव्यतेची झलक तुम्हाला पाहायला मिळेल.
याला अशाप्रकारे डिझाईन करण्यात आले आहे की तुम्ही ते तुमच्या घरामध्ये स्मृती चिन्हाच्या स्वरूपामध्ये देखील जपून ठेवू शकतात. या नाण्याच्या एका बाजूला श्रीरामांची लहानशी प्रतिकृती दिसेल आणि दुसऱ्या बाजूला अयोध्याच्या प्रतिष्ठित मंदिराची झलक पाहायला मिळेल.