Banking News : बँक हा सर्वांच्याच आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनलेला आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिना सुरू होण्यापूर्वीच बँक खातेधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे. खरंतर फेब्रुवारी महिना हा यावर्षी 29 दिवसांचा राहणार आहे. मात्र या 29 दिवसांमध्ये अकरा दिवस देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये बँका बंद राहणार आहेत. यामुळे जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात बँकेशी निगडित काही महत्त्वाची कामे करायची असतील तर तुम्हाला ही कामे लवकरात लवकर उरकून घ्यावी लागणार आहेत.
आरबीआयने फेब्रुवारी महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये फेब्रुवारीत बँक 11 दिवसांसाठी बंद राहणार हे स्पष्ट होत आहे. मात्र, सर्वच राज्यांमध्ये बँका 11 दिवसांसाठी बंद राहणार नाहीत. राज्य निहाय सुट्ट्यांची यादी वेगवेगळी राहणार आहे.
अशा परिस्थितीत, आता आपण फेब्रुवारी महिन्यात कोणत्या तारखेला कोणत्या राज्यात बँका बंद राहणार याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दरम्यान, बँका बंद असल्या तरी ग्राहकांना नेट बँकिंग करता येणार आहे तसेच यूपीआय एप्लीकेशनचा वापर करून पेमेंट करता येणार आहे.
फेब्रुवारीत कोणत्या तारखांना बंद राहणार बँक
4 फेब्रुवारी : रविवार असल्याने या दिवशी संपूर्ण भारतात बँका बंद राहणार आहेत.
10 फेब्रुवारी : दुसरा शनिवार असल्याने या दिवशी देखील संपूर्ण भारतात बँका बंद राहणार आहेत.
11 फेब्रुवारी : रविवार असल्याने या दिवशी देखील संपूर्ण भारतात बँका बंद राहणार आहेत.
14 फेब्रुवारी : वसंत पंचमी किंवा सरस्वती पूजा निमित्ताने देशातील त्रिपुरा, ओरिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये बँकेचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
15 फेब्रुवारी : लुई-नगाई-नी निमित्ताने देशातील ईशान्य कडील मणिपूर या राज्यात बँकेचे कामकाज बंद ठेवले जाणार आहे.
18 फेब्रुवारी : रविवार निमित्ताने संपूर्ण देशात बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.
19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आपल्या महाराष्ट्रात बँका बंद राहणार आहेत.
20 फेब्रुवारी : मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यां राज्यात राज्य दिन निमित्ताने बँका बंद राहणार आहेत.
24 फेब्रुवारी : शनिवार असल्याने या दिवशी संपूर्ण भारतात बँका बंद राहणार आहेत.
25 फेब्रुवारी : रविवार असल्याने या दिवशी संपूर्ण भारतात बँका बंद राहतील.
26 फेब्रुवारी : न्योकुम या निमित्ताने अरुणाचल प्रदेश येथे बँका बंद राहणार आहेत.