पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची असलेली सीपीपीएस यंत्रणा संपूर्ण देशात लागू! जाणून घ्या काय मिळतील फायदे?

भारतामध्ये एकूण जर आपण पेन्शनधारकांची संख्या बघितली तर ते जवळपास 78 लाख इतकी आहे. म्हणजेच भारतामध्ये ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांची संख्या 78 लाख असून त्यांच्या सगळ्या पेन्शनचे व्यवस्थापन हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून केले जाते

pension new rule

CPPS Pension System:- भारतामध्ये एकूण जर आपण पेन्शनधारकांची संख्या बघितली तर ते जवळपास 78 लाख इतकी आहे. म्हणजेच भारतामध्ये ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांची संख्या 78 लाख असून त्यांच्या सगळ्या पेन्शनचे व्यवस्थापन हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून केले जाते

परंतु यामध्ये जर बघितले तर पेन्शन काढण्यासंबंधी अनेक प्रकारच्या समस्या बऱ्याचदा निवृत्तीवेतनधारकांना येतात. यातील जर प्रमुख समस्या बघितली तर ती बँकेच्या शाखेतून निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन काढणे या संदर्भात होती व यामुळे बरेच जण त्रस्त होते.

परंतु आता केंद्रकृत पेन्शन पेमेंट प्रणाली म्हणजेच सीपीपीएस सिस्टम संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आली आहे व आता निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पेन्शनचे पैसे देशातील कोणत्याही बँके शाखेतून काढता येणे शक्य होणार आहे व इतकेच नाही तर ही प्रणाली एक जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली आहे.

सीपीपीएस प्रणाली देशात लागू केल्यामुळे पेन्शनधारकांना काय मिळतील फायदे?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली अर्थात सीपीपीएस प्रणाली एक जानेवारी 2025 रोजी देशात लागू करण्यात आली असून या प्रणालीमुळे आता देशातील जे काही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे 78 लाख निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांना खूप मोठा फायदा होणार आहे.

त्यातील पहिला फायदा जर बघितला तर आता निवृत्तीवेतनधारकांना आपले पेन्शन कोणत्याही बँकेच्या शाखेतून काढता येणे शक्य होणार आहे.

त्यामुळे ही पेन्शन पेमेंट प्रणाली खूप मोठा बदल या क्षेत्रात घेऊन आली असून या प्रणालीमुळे राष्ट्रीय स्तरावर पेन्शन पेमेंटची सुविधा मिळण्यास मदत झाली आहे व त्यामुळेच आता कुठल्याही बँकेच्या शाखेतून पेन्शन काढणे शक्य होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे जे काही ईपीएस पेन्शनधारक आहेत त्यांना या सिस्टमचा लाभ होणार आहे.

यामध्ये एखादा कर्मचारी निवृत्त झाला व त्याला त्याच्या रिटायरमेंट म्हणजेच निवृत्तीनंतर आपल्या मूळ गावी राहायला जायचे असेल तर त्यांच्यासाठी ही प्रणाली वरदानच ठरणार आहे. म्हणजेच निवृत्तीवेतनधारकांना स्थलांतर केल्यानंतर देखील कुठलीही समस्येशिवाय त्यांची पेन्शन आपल्या गावातील बँकेतून देखील काढता येणार आहे.

पेन्शन पेमेंट आदेश म्हणजेच पीपीओ हस्तांतरित करण्याची गरज राहणार नाही
या अगोदरचा नियम जर बघितला तर पूर्वी जर एका गावातून दुसऱ्या गावात स्थलांतर केले म्हणजेच गाव बदलले तर निवृत्तीवेतन नव्या गावात स्थलांतरित करून घ्यावे लागत असे. याकरिता पेन्शन पेमेंट आदेश म्हणजेच पीपीओ एका कार्यालयाकडून दुसऱ्या कार्यालयाकडे ट्रान्सफर करावा लागत असे.

या सगळ्या प्रक्रियेला खूप वेळ तर लागायचाच. परंतु अनेक पद्धतीचा त्रास देखील निवृत्तीवेतनधारकांना सहन करावा लागत होता. परंतु आता सीपीपीएस प्रणालीमुळे निवृत्ती वेतनधारकाने गाव बदलले तरी देखील पेन्शन पेमेंट आदेश म्हणजेच पीपीओ एका कार्यालयाकडून दुसऱ्या कार्यालयाकडे हस्तांतरण करण्याची गरज नाही.

म्हणजेच पीपीओ हस्तांतरणाशिवाय निवृत्तीवेतनधारकांना त्यांनी बदललेल्या गावातील बँकेतून पेन्शन मिळू शकेल. यामध्ये कर्मचाऱ्यांनी बँक जरी बदलली तरी देखील पेन्शनवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही व कुठल्याही त्रासाशिवाय तो कोणत्याही ठिकाणहून बँकेच्या कोणत्याही शाखेतून पेन्शन काढू शकणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe