Credit Card Bill : सध्या क्रेडिट कार्डचा वापर वाढत चालला आहे. परंतु जर तुम्ही क्रेडिट कार्डचा योग्य पद्धतीने वापर केला तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. नाही तर क्रेडिट कार्ड तुम्हाला कर्जाच्या जाळ्यात अडकवेल. अनेकदा आपल्याला पैशांची गरज असते.
समजा तुम्ही क्रेडिट कार्डची थकबाकी भरली नाही तर तुम्हाला एकूण 40% वार्षिक शुल्क भरावे लागेल. परंतु सध्या क्रेडिट कार्ड कंपन्या ग्राहकांकडून गुपचूप शुल्क आकारत आहेत. ज्याची त्यांना कल्पनाही नसते. आर्थिक फटका बसण्यापूर्वीच जाणून घ्या.
कॅश अॅडव्हान्स फी
कॅश अॅडव्हान्स फी ही कंपनीकडून क्रेडिट कार्ड एटीएममधून पैसे काढण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम आहे. शक्यतो ती 2.5 टक्के असते. या कारणामुळे क्रेडिट कार्डमधून कधीही रोख रक्कम काढणे टाळावे. हे लक्षात घ्या की बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनी रोख रक्कम थेट कर्ज मानत असते.
विलंब शुल्क
समजा तुम्ही क्रेडिट कार्ड बिलांच्या विलंबाने भरणा केला तर कंपनीकडून विलंब शुल्क घेतले जाते. त्याची किंमत 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत असून तुम्हाला थकबाकीवर वेगळे व्याज द्यावे लागणार आहे. त्यामुळे तुमच्या बिलात वाढ होते.
आकारले जाते वार्षिक शुल्क
प्रत्येक क्रेडिट कार्ड कंपनीकडून वार्षिक देखभाल शुल्क आकारण्यात येते. मोफत क्रेडिट कार्डमध्ये असे पाहायला मिळत आहे की वार्षिक शुल्क एका वर्षासाठी माफ करण्यात येते. पुढील वर्षापासून बँका कोणतीही पूर्वसूचना न देता मूकपणे वार्षिक शुल्क घेत असतात.
रिवॉर्ड रिडेम्पशन शुल्क
क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या खर्चावर रिवॉर्ड पॉइंट देण्यात येतात. तसेच काही क्रेडिट कार्ड्स रिवॉर्ड्समध्ये उत्पादने आणि व्हाउचर समाविष्ट केले असल्यास रिवॉर्ड रिडेम्पशन फी आकारली जाते. याची अनेकांना माहिती नसते.
रेल्वे तिकीट आणि पेट्रोल खरेदी
रेल्वे, मेट्रो आणि पेट्रोलच्या खरेदीवर अनेक वेळा क्रेडिट कार्ड कंपन्यांकडून शुल्क आकारण्यात येते. त्यामुळे तुम्ही नेहमी ट्रेन तिकीट आणि पेट्रोल खरेदी करण्यासाठी विशेष क्रेडिट कार्डचा वापर करावा.