Credit Card Default : क्रेडिट कार्ड बिल भरताना घ्या या गोष्टींची काळजी! अन्यथा व्हाल डिफॉल्टर, होऊ शकते आर्थिक नुकसान

Credit Card Default

Credit Card Default : आजकाल अनेकजण कॅशलेस व्यवहार करत आहेत. डिजिटल इंडियामध्ये अनेकजण UPI आणि डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे देखील आणि तोटे देखील आहेत.

जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरताना योग्य प्रकारची काळजी घेतली नाही तर तुम्ही देखील डिफॉल्टर होऊ शकता. त्यामुळे तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते आणि समस्या देखील निर्माण होऊ शकतात.

क्रेडिट कार्ड डीफॉल्ट म्हणजे काय?

क्रेडिट कार्ड डिफॉल्ट म्हणजे काय हे सर्वात प्रथम जाणून घेऊया. जर तुमच्याकडून क्रेडिट कार्डचे बिल एक किंवा दोन वेळा भरले गेले नाही तर तुम्हाला डिफॉल्ट मानले जात नाही. मात्र तुमच्याकडून अनेक महिन्यांचे किमान देय रक्कम भरण्यात आली नाही तर तुम्हाला डीफॉल्ट मानले जाते.

क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना जर ६ वेळा पेमेंट न भरल्यास सूचित करण्यात येते. जर तुम्ही असे केल्यास तुमच्याकडून जास्त व्याजदर आकारले जाते. आणि तुम्हाला डिफॉल्टर म्हणून घोषित केले जाते.

या कारणांमुळे तुम्ही क्रेडिट कार्ड डिफॉल्टर होऊ शकता

क्रेडिट कार्ड बिल भरण्याची देय तारीख चुकली

जर तुमच्याकडून क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची तारीख चुकली तर आणि तुम्ही सतत क्रेडिट कार्ड बिल भरण्याची तारीख चुकवत गेला तर तुम्हाला डिफॉल्टर म्हणून मानले जाते आणि तुमच्याकडून जास्त व्याजदरसहित पैसे वसूल केले जातात.

मंजूर मर्यादेपेक्षा जास्त खर्च करणे

तुम्हाला कोणत्याही बँकेकडून क्रेडिट कार्ड करण्यास देताना त्याच्यावरील मर्यादा ठरवली जाते. या मर्यादेप्रमाणेच तुम्हाला त्यावरील रक्कम वापरावी लागते. जर तुम्ही त्यापेक्षा जास्त रक्कम वापरली तर तुम्ही डिफॉल्टर होऊ शकता.

क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्ये विलंब

जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर त्याचे अनेक नुकसान तुम्हाला सहन करावे लागतात. त्यामुळे वेळेवर क्रेडिट बिल न भरणे तुमच्या क्रेडिट स्कोअर खराब करू शकते. तसेच जास्त व्याज तुमच्याकडून आकाराला जाईल.

क्रेडिट स्कोअरवर थेट परिणाम

डिफॉल्टिंगचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर थेट परिणाम होईल. चुकलेली किंवा उशीरा रक्कम भरणे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी करतात.

क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरा. वेळेवर किंवा वेळेअगोदर भरलेले क्रेडिट कार्डचे बिल तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

वाढीव व्याजदर लावले जातील

जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर तुमच्याकडून वाढीव व्याजदर आकारले जाईल. 30-35 टक्क्यांपर्यंत याचा व्याजदर असू शकतो. त्यामुळे तुम्हाला जास्तीचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी तुम्ही वेळेवर क्रेडिट कार्डचे बिल भरा.

क्रेडिट कार्ड खाते ब्लॉक केले जाईल

जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही किंवा सतत बिल भरण्यास विलंब लावला तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट कार्डवर होऊ शकतो. तुम्ही अनेकदा बिल भरण्याची तारीख चुकवली तर तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक केले जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe