Credit Card : सध्या मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्डचा वापर केला जात आहे. क्रेडिट कार्डमुळे अनेक कामे सोयीस्कर होतात. ग्राहकांना आता बँकेच्या लांबच लांब उभे राहून पैसे काढावे लागत नाहीत. तसेच क्रेडिट कार्डचे इतरही अनेक फायदे आहेत.
जसे क्रेडिट कार्डचे फायदे आहेत तसेच त्याचे तोटेदेखील आहेत. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्यासंबंधित तुम्हाला सर्व नियम माहिती असणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. कसे ते जाणून घ्या.
क्रेडिट कार्डवर अधिक खर्च करण्याचे एक मुख्य कारण हे आहे की त्यांना 50 दिवसांपर्यंत व्याजमुक्त क्रेडिट टाइम मिळत असतो. त्यानंतरचे पेमेंट पुढे ढकलण्यात येते. जर हे सतत झाले तर वापरकर्त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की बेजबाबदार वापर आणि परतफेड त्वरीत कर्ज होईल. कारण आता क्रेडिट कार्डवर भारी शुल्क आणि उशीरा पेमेंट दंड आकारण्यात येत आहे. या ठिकाणी हे लक्षात घ्या की देय तारखेपर्यंत कमीत कमी देय रक्कम भरली तर, तुम्हाला उशीर होईल.
अनेक कार्डधारकांना वाटते की कमीत कमी देय रक्कम भरणे पुरेसे आहे. ज्यावेळी तुम्ही एकूण देय रकमेपेक्षा कमी रक्कम भरत असता त्यावेळी उर्वरित रकमेवर शुल्क आकारण्यात येते. जे प्रत्येक वर्षी 20% ते 44% पर्यंत असून ते कार्डवर अवलंबून असते. तुमच्या क्रेडिट कार्डवर न भरलेली शिल्लक असेल तर, नवीन व्यवहार व्याजमुक्तीसाठी पात्र नसतात. याचाच असा अर्थ की तुम्ही केलेल्या सर्व नवीन खरेदीवर पहिल्या दिवसापासून जास्त आर्थिक शुल्क आकारण्यात येईल.
फॉलो करा या टिप्स
- देय तारखेपर्यंत तुम्हाला परतफेड करता येते. तेवढाच खर्च करा.
- यात केवळ फक्त किमान रक्कम भरू नका. म्हणजेच, तुमच्या क्रेडिट कार्डची संपूर्ण शिल्लक नेहमी देय तारखेच्या आधी भरावी.
- तसेच तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या बिलाच्या पेमेंटमध्ये आधीच मागे पडत असल्यास ते ईएमआयमध्ये रूपांतरित करण्याचा विचार करून काही महिन्यांत पेमेंट करा.
- त्याशिवाय हे लक्षात घ्या की रोख काढण्यासाठी तुमचे क्रेडिट कार्ड वापरू नका कारण ते व्याजमुक्त कालावधीसाठी पात्र नसते.
- तुम्हाला ऑफर करण्यात आलेली संपूर्ण क्रेडिट मर्यादा संपवण्याची सवय लावू नका कारण याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर विपरित परिणाम होईल. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात क्रेडिट मिळणे कठीण होते.