Investment In Gold: सरकार देत आहे तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी! 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान गुंतवू शकतात पैसे

Ajay Patil
Published:
investment in gold

Investment In Gold:- गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत असतात व हा विचार करताना प्रामुख्याने गुंतवणुकीचे सुरक्षितता आणि मिळणारा  परतावा या दोन महत्त्वाच्या बाबी डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक पर्यायांचा विचार केला जातो.

गुंतवणुकीसाठी अनेक सरकारी योजना तसेच बँकेतील मुदत ठेव योजना व पोस्ट ऑफिसच्या योजना या विश्वासार्ह अशा समजल्या जातात. तसेच म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक गुंतवणूकदारांच्या माध्यमातून केली जाते.

तसेच जर गुंतवणुकीची एक फार पूर्वीपासूनची पद्धत पाहिली तर सोन्यातील गुंतवणुकीला देखील मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. आज देखील मोठ्या प्रमाणावर बरेच जण सोन्यात गुंतवणूक करतात. जर तुम्हाला देखील सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर यासाठी सरकारने तुम्हाला  सॉवरेन गोल्ड बॉण्ड्सच्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.

जर तुम्हाला देखील सॉवरेन गोल्ड बॉण्ड योजना 2023-24 अंतर्गत सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ते 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान करू शकता. या गोल्ड बॉण्डचे  वैशिष्ट्य म्हणजे हे तुम्हाला नेहमी खरेदी करता येत नाही. त्यासाठी वेळोवेळी तारीख निश्चित केली जाते. हे सरकारी बॉण्ड आहेत व ते आरबीआयने जारी केलेले असतात.

 काय असतात नेमके सॉॉवेरेन गोल्ड बॉंड?

 हे सरकारी बॉण्ड असतात व ते रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून जारी करण्यात येतात. या गोल्ड बॉण्डचे डिमॅटमध्ये तुम्हाला रूपांतर करता येते. हा बॉण्ड एक ग्रॅम सोन्याचा असतो. म्हणजेच एक ग्राम सोन्याची किंमत ही बॉण्ड किंमत असते.

या गोल्ड बॉण्डच्या माध्यमातून तुम्हाला 24 कॅरेटच्या 99.9% शुद्ध सोन्यात गुंतवणूक करता येऊ शकते. जर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यावर आणि डिजिटल पेमेंट केले तर प्रति ग्रॅम पन्नास रुपयांची सूट तुम्हाला उपलब्ध आहे आणि कोणतीही व्यक्ती एका आर्थिक वर्षामध्ये कमीत कमी एक ग्राम आणि जास्तीत जास्त चार किलो सोन्यात गुंतवणूक या माध्यमातून करू शकते.

 कुठून खरेदी करता येतील तुम्हाला सोव्हरेन गोल्ड बॉंड?

 तुम्हाला हे गोल्ड बॉण्ड बँकांमधून ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदी करता येऊ शकतात. तसेच तुम्ही पोस्ट ऑफिस मधून देखील ते खरेदी करू शकतात.

याशिवाय तुम्ही स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून देखील हे बॉण्ड खरेदी करू शकतात व यासोबतच बीएसई आणि एनएसई प्लॅटफॉर्मवरून देखील खरेदी करता येणे शक्य आहे.

 काय आहेत या सॉवरेन गोल्ड बॉंडचे फायदे?

 यावर तुम्हाला वार्षिक 2.4% व्याज मिळते जे दर सहा महिन्यांनी दिले जाते. समजा बाजारामध्ये जर सोन्याची किंमत वाढली तर तुम्ही केलेल्या गुंतवणुकीची किंमत म्हणजे तिचे मूल्य देखील वाढते. तसेच डिमॅट असल्यामुळे सुरक्षेची कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज राहत नाही.

विशेष म्हणजे यातील गुंतवणूक जीएसटीच्या कक्षेमध्ये येत नाही. या व्यतिरिक्त तुम्ही भौतिक सोन्यामध्ये गुंतवणूक कराल तर त्यावर तीन टक्के जीएसटी लावला जातो. तसेच तुम्हाला या बॉण्ड्सच्या माध्यमातून कर्जदेखील घेता येऊ शकते.

यामध्ये सोन्याच्या शुद्धतेची कोणत्याही प्रकारची अडचण किंवा समस्या राहत नाही. कारण हे सगळे कागदी असल्यामुळे त्याच्या शुद्धतेबद्दल काळजी करण्याची कुठलीही गरज भासत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe