DA Hike : कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा पगार देखील वाढणार आहे.
तसेच राज्य सरकारकडून पेन्शनधारकांसाठीच्या महागाई सवलतीतही वाढ करण्यात आल्याची देखील घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 15 ते 20 हजार रुपयांची वाढ होणार आहे.
मध्य प्रदेश सरकारकडून कर्मचाऱ्यांना ही भेट देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील 7.5 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
महागाई भत्त्याचा दर ४२ टक्क्यांवर
मध्य प्रदेश राज्यातील कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढ करण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांचा DA ४२ टक्के झाला आहे. कर्मचाऱ्यांचा DA ३८ टक्के होता. आता कर्मचाऱ्यांना ४२ टक्के DA मिळणार आहे. लवकरच वित्त विभागाकडून आदेश जारी करण्यात येतील. प्रत्येक महिन्याला प्रथम श्रेणी अधिकाऱ्याला 6000 रुपयांपर्यंतचा पर्यंतचा लाभ मिळू शकतो.
सरकारवर 1000 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा
मध्य प्रदेश सरकारकडून जूनअखेरीस कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचे आदेश जारी करण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून महागाई भत्ता वाढ दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच कर्मचाऱ्यांना DA थकबाकी देखील दिली जाणार आहे.
कर्मचाऱ्यांचा DA वर्षातून दोन वेळा वाढवण्यात येतो. वर्षातील पहिला DA जानेवारी महिन्यात वाढवण्यात येतो मात्र यंदा कर्मचाऱ्यांचा DA जून महिन्यामध्ये वाढवण्यात आल्याने जानेवारी २०२३ पासूनची DA थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये ५ महिन्यांची DA थकबाकी सरकारकडून वर्ग केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना आता ४२ टक्के DA दिला जाणार आहे त्यामुळे सरकारवर 1000 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे.
केंद्र सरकारकडून देखील कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्यात आली आहे
केंद्र सरकारकडून लाखो कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये मार्च महिन्यात वाढ करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांची DA थकबाकी देखील दिली जाणार आहे. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये ४ टक्के वाढ करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA देखील ४२ टक्के झाला आहे. लवकरच केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांची दुसरी DA वाढ देखील केली जाणार आहे.