DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकारने केली 3 टक्के वाढ! वाचा आता किती वाढेल पगार?

केंद्र सरकारने बुधवारी महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ केली व या वाढीसोबत आता कर्मचाऱ्यांना 53% इतका महागाई भत्ता लागू होणार आहे.

Ajay Patil
Published:
da hike

DA Hike:- गेल्या कित्येक महिन्यापासूनची केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा अखेर संपली असून दिवाळी सारख्या महत्त्वाच्या सणाच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून महागाई भत्त्यात वाढ करत एक मोठी भेट देण्यात आलेली आहे.

त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक आनंदाचे वातावरण यामुळे निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने बुधवारी महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ केली व या वाढीसोबत आता कर्मचाऱ्यांना 53% इतका महागाई भत्ता लागू होणार आहे. विशेष म्हणजे महागाई भत्त्यातील करण्यात आलेली ही वाढ एक जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार आहे.

 महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केल्यामुळे पगारात किती होणार वाढ?

केंद्र सरकारने बुधवारी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील यामुळे वाढ होणार आहे. आपल्याला माहित असेलच की केंद्रीय सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांना असलेल्या मूळ वेतनाच्या आधारावर ठरवला जातो.

समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 25 हजार रुपये असेल आता महागाई भत्ता 53% झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये महागाई भत्ता साडेबारा हजार रुपयांवरून 13250 रुपयापर्यंत वाढेल. म्हणजेच महागाई भत्त्यामध्ये प्रत्येक महिन्याला 750 रुपयांची वाढ आता झालेली आहे.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे महागाई भत्त्यातील ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होत असल्यामुळे जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी साधारणपणे 2250 रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याला 750 याप्रमाणे दिली जाणार आहे. अशाप्रकारे महागाई भत्त्यातील वाढ आणि डीएची थकबाकी ही कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पगारामध्ये मिळणार आहे.

सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन तसेच महागाई आणि घरभाडे भत्ता जोडून कर्मचाऱ्यांचा अगोदर पगार 50 हजार रुपये होता तर आता या महिन्यापासून तो 50750 रुपये इतका होणार आहे व ऑक्टोबर महिन्याच्या पगारामध्ये तीन महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी 2250 रुपये देखील मिळणार आहे.

आपल्याला माहित असेलच की केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो व पेन्शनधारकांना डीआर दिला जातो व या दोन्हींमध्ये जानेवारी आणि जुलैमध्ये अशी वर्षातून दोनदा वाढ केली जाते. या अगोदर मार्च महिन्यात केंद्र सरकारने महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली होती व आता तीन टक्क्यांची वाढ करत महागाई भत्ता 53% झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe