DA Hike Update: ‘या’ लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! महागाई भत्त्यात झाली ‘इतकी’ वाढ, सरकारकडून या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

Ajay Patil
Published:

DA Hike Update:- कित्येक दिवसापासून देशातील केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारकडून महागाई भत्ता वाढीच्या घोषणेची प्रतीक्षा होती. साधारणपणे या सणासुदीच्या कालावधीमध्ये महागाई भत्तावाढ केली जाईल अशा आशयाच्या बातम्या देखील माध्यमांमधून सारख्या येत होत्या. याच अनुषंगाने केंद्र सरकारच्या माध्यमातून  देशातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून खास भेट देण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांना अगोदर मिळणाऱ्या बेचाळीस टक्के महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्यात आली असून तो आता 46 टक्के झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये देखील आता वाढ होण्यास मदत होणार आहे. इतकेच नाहीतर महागाई भत्त्याची जी काही तीन महिन्याची थकबाकी होती ती देखील मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

 रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रेल्वे विभागाच्या माध्यमातून देखील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा करण्यात आली असून त्यानुसार आता रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यात आला आहे. तसेच महागाई भत्त्यातील ही वाढ एक जुलै 2023 पासून लागू होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

23 ऑक्टोबर 2023 रोजी रेल्वे बोर्डाच्या माध्यमातून या विषयची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार विचार केला तर अखिल भारतीय रेल्वे आणि उत्पादन युनिटचे महाव्यवस्थापक आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी यांनी निर्णय घेतला आहे की आता महागाई भत्ता 42% वरून 46 टक्के करण्यात येणार आहे.

तसेच जुलै 2023 पासून थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याची माहिती देखील या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे व ही थकबाकीची रक्कम पुढच्या महिन्याच्या पगारासोबत जमा करण्यात येणार आहे.याबद्दल अधिकची माहिती देताना नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वे मेनचे सरचिटणीस एम राघवैय्या यांनी म्हटले आहे की हा निर्णय महागाई दराच्या आधारावर घेण्यात आला असून कर्मचाऱ्यांवर महागाईचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये हा या निर्णय घेण्यामागील उद्देश आहे.

 केंद्रीय सरकारने कर्मचाऱ्यांना जाहीर केला दिवाळी बोनस

महागाई भत्ता वाढवण्याच्या रेल्वे बोर्डाच्या निर्णया अगोदर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे.  केंद्र सरकारने गट क आणि बिगर गॅझट म्हणजेच अराजपत्रित गट ब अधिकाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला होता. केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या या बोनसची कमाल मर्यादा सात हजार रुपये निश्चित करण्यात आली असून  बोनस करिता केंद्र सरकारच्या माध्यमातून पंधराशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

त्यामुळे बोनस आणि महागाई भत्त्यातील वाढीचा लाभ यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे हे मात्र निश्चित.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe