DA Hike Update:- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून महागाई भत्ता वाढ ही एक महत्त्वपूर्ण बाब असून येणाऱ्या वर्षांमध्ये याबाबतीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाची व आनंदाची बातमी यासंबंधी मिळण्याची शक्यता आहे. जर आपण सध्या मिळत असलेला महागाई भत्ताचा विचार केला तर तो गेल्या काही दिवसांपासून चार टक्क्यांनी वाढला असून अगोदर कर्मचाऱ्यांना जो काही बेचाळीस टक्के इतका महागाई भत्ता मिळत होता
तो आता 46 टक्क्यांपर्यंत मिळत असून एक जुलै 2023 पासून तो लागू करण्यात आलेला आहे. आपल्याला माहित आहेस की महागाई भत्ता हा एआयसीपीआय निर्देशांकावरून प्रामुख्याने ठरवला जातो. 31 डिसेंबर पर्यंत हे एआयसीपीआय निर्देशांक जाहीर होण्याची शक्यता असून

त्यावरून जानेवारी 2024 चा वाढीव महागाई भत्ता किती वाढू शकतो याची आपल्याला कल्पना येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत एआयसीपीआय निर्देशांक किती वर पोहोचला आहे व त्याच्या परिणाम हा महागाई भत्ता वाढीवर कसा होऊ शकतो? यासंबंधीची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
सध्या काय आहे हे एआयसीपीआय निर्देशांकाची स्थिती?
आपण ऑक्टोबर 2023 चा विचार केला तर या कालावधीपर्यंत एआयसीपीआय निर्देशांकाची संख्या ही 138.4 अंकांवर पोहोचलेली आहे व सप्टेंबर च्या तुलनेत विचार केला तर या संख्येमध्ये 0.9 अंकांची वाढ दिसली आहे. या अंकांवरून जर आपण अंदाज लावला तर महागाई भत्त्याचा स्कोर हा 49.08% टक्क्यांवर आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अन्नधान्यामध्ये जी काही महागाई आली आहे त्यामुळे निर्देशांकामध्ये वाढ होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. असे झाले तर महागाई भत्त्यामध्ये आणखी 1.50 टक्क्यांची वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येईल.
जानेवारीत होऊ शकते चार ते पाच टक्क्यांची महागाई भत्त्यात वाढ
जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्ता चार किंवा पाच टक्क्यांची वाढवण्याची शक्यता असून आजपर्यंतच्या प्राप्त आकड्यांचा अंदाज घेतला तर तो चार टक्क्यांपर्यंत असणार आहे.
परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या एआयसीपीआय निर्देशांकामध्ये जर वाढ झाली तर महागाई भत्त्यात पाच टक्क्यांची वाढ होऊ शकते. जर सध्या आपण काही ट्रेंड पाहिला तर त्यानुसार महागाई भत्ता 51% पर्यंत पोहोचण्याची शक्यता देखील आहे. निर्देशांकात चार टक्क्यांची वाढ झाली तर महागाई भत्ता 50% पर्यंत जाऊ शकतो.
एआयसीपीआय निर्देशांकाचे सप्टेंबर व ऑक्टोबर मधील आकडे व महागाई भत्त्यावर त्याचा परिणाम
जर आपण एआयसीपीआय निर्देशांकाचे आतापर्यंत म्हणजे जुलै ते ऑक्टोबर पर्यंतचे आकडे पाहिले तर त्यानुसार सध्या एआयसीपीआय निर्देशांक 138.4 अंकांवर आहे. या आकड्यानुसार मोजलेल्या महागाई भत्त्याचा स्कोर हा 49.08 टक्क्यांवर आहे. नोव्हेंबर मध्ये हा आकडा 50% च्या पुढे जाण्याचा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
त्यानंतर डिसेंबर महिन्यातील निर्देशांक 0.54 टक्क्यांनी वाढला तर महागाई भत्यात 51 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये डिसेंबर 2023 मधील एआयसीपीआय निर्देशांकाचे आकडे अंतिम महागाई भत्ता किती वाढेल हे निश्चित करतील.