DA Update :- हा सप्टेंबर महिना केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता खूप महत्त्वाचा आणि खास असणार अशी शक्यता आहे. कारण सध्या आगामी काळामध्ये भारतात लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्यामुळे अनेक लोकहिताचे निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतले जातील असे देखील बोलले जात आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचे असलेले मुद्दे म्हणजे महागाई भत्ता वाढ होय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता अर्थात डीएमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहे. ही वाढ साधारणपणे चार टक्क्यांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या कर्मचारी व पेन्शनधारकांना 42 टक्के महागाई भत्त्याचा लाभ दिला जात असून यामध्ये जर चार टक्क्यांची वाढ झाली तर तो 46% पर्यंत होऊ शकतो. कर्मचारी याची आतुरतेने वाट पाहत असून लवकरच सरकार याबाबत निर्णय घेईल अशी शक्यता आहे.
महागाई भत्त्याबाबत येऊ शकतात या चांगल्या बातम्या
जर आपण केंद्रीय कर्मचारी व पेन्शन धारकांचा विचार केला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना लवकरच 18 महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी देखील देण्याची तयारी सुरू आहे व सरकारने जर महागाई भत्त्याची थकबाकी मंजूर केली तर कर्मचाऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर जे कर्मचारी उच्च पदांवर आहेत त्यांना दोन लाख रुपयांपेक्षा जास्त फायदा यामुळे होऊ शकतो.
18 महिन्यांची थकबाकी तीन हप्त्यांमध्ये देण्याची सरकारची योजना आहे. केंद्र सरकारने साधारणपणे जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत महागाई भत्ता थकबाकीचे पैसे दिलेले नाहीत व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने या थकबाकीची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर केंद्र सरकार याबाबतीत निर्णय घेईल अशी शक्यता आहे.
जर महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ झाली तर कर्मचाऱ्यांना किती होईल फायदा?
आपल्याला माहित आहेच की, कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या महागाई भत्त्यातील वाढ ही वर्षातून जानेवारी आणि जुलै अशा कालावधीमध्ये करण्यात येते म्हणजेच वर्षातून दोनदा ही वाढ होत असते. सध्या कर्मचाऱ्यांना जानेवारी 2023 च्या आधारे 42 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. जर जुलै महिन्याचा एआयसीपीआय निर्देशांकाचा विचार केला तर त्यावर आधारित तीन टक्के महागाई भत्त्यात वाढ होईल अशी देखील एक शक्यता आहे.
जर तीन टक्क्यांची वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 45% इतका महागाई भत्ता मिळेल. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन 18000 आहे त्यांना सध्या मिळणाऱ्या 42% महागाई भत्त्याच्या आधारे 7560 रुपये भत्ता मिळत आहे. जर यामध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली तर तो 45 टक्के होईल व या आधारावर कर्मचाऱ्यांना मिळणारा भत्ता हा आठ हजार शंभर रुपये इतका होईल. म्हणजेच 18 हजार रुपये किमान पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार हा 26 हजार 100 रुपये होईल.