DA Hike: सप्टेंबरच्या ‘या’ तारखेला होईल महागाई भत्ता वाढीची घोषणा? अन मिळेल 3 महिन्याची थकबाकी

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या महागाई भत्त्या हा जुलै 2024 पासून लागू होणार असून त्याची तारीख आता निश्चित झाल्याचे जवळपास जमा आहे. साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महागाई भत्ता वाढीची घोषणा होणार असून या महागाई भत्त्यामध्ये किती वाढ होईल हे एआयसीपीआय निर्देशांकाच्या जानेवारी ते जून 2024 च्या आकडेवारी वरून जवळपास स्पष्ट झालेले आहे.

Ajay Patil
Published:
da hike

DA Hike:- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाची बातमी समोर येत असून कर्मचारी ज्या महागाई भत्ता वाढीची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांना या महिन्यात लवकरच याबाबतीत काहीतरी आनंदाची बातमी ऐकायला येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

कारण लवकरच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता असून त्यामुळे कर्मचाऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

 किती होणार महागाई भत्त्यात वाढ?

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या महागाई भत्त्या हा जुलै 2024 पासून लागू होणार असून त्याची तारीख आता निश्चित झाल्याचे जवळपास जमा आहे. साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महागाई भत्ता वाढीची घोषणा होणार असून या महागाई भत्त्यामध्ये किती वाढ होईल हे एआयसीपीआय निर्देशांकाच्या जानेवारी ते जून 2024 च्या आकडेवारी वरून जवळपास स्पष्ट झालेले आहे.

सातवा वेतन आयोग अंतर्गत जे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक पगार घेतात त्यांना याचा थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपल्याला माहित आहे की जानेवारी 2024 पासून महागाई भत्ता 50% झाला असून जून महिन्यात मात्र एआयसीपीआय निर्देशांकामध्ये दीड अंकांची वाढ झालेली आहे.

त्यामुळे महागाई भत्त्याचा आकडा देखील वाढल्याचे सांगितले जात आहे. एआयसीपीआय- आयडब्ल्यू निर्देशांकाच्या आकड्यावरून असे ठरले आहे की, जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ मिळेल.

मे महिन्यात हा निर्देशांक 139.9 अंकावर होता व तो आता 141.4 अंकांपर्यंत वाढला आहे व यामुळे महागाई भत्त्याचा जो काही स्कोर आहे तो 53.36 झाला असून याचाच अर्थ असा होतो की यावेळी महागाई भत्यात तीन टक्क्यांची वाढ होणार आहे.

 25 सप्टेंबर रोजी होऊ शकते घोषणा

सातव्या वेतन आयोग अंतर्गत असलेली केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना 53% महागाई भत्ता दिला जाणार असून 25 सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंबंधीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

कारण या बैठकीच्या अजेंड्यामध्ये याचा समावेश करण्यात आला असून फक्त आता औपचारिक घोषणाच बाकी असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे.

 मिळेल तीन महिन्याची थकबाकी

तसेच केंद्र कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीसोबतच तीन महिन्याच्या थकबाकी संदर्भात देखील महत्वाची माहिती समोर आलेली आहे. सप्टेंबरच्या शेवटी महागाई भत्ता जाहीर केला जाईल व तो कर्मचाऱ्यांच्या हातात ऑक्टोबरच्या पगारांसोबत मिळेल.

इतकेच नाहीतर कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तीन महिन्यांची थकबाकी देखील मिळणार आहे. ही थकबाकी मागील महागाई भत्ता आणि नवीन महागाई भत्त्यातील वाढ यांच्यातील फरकाच्या स्वरूपात असेल.

महागाई भत्ता आता सध्या 50% आहे व तो जेव्हा 53% होईल त्यामुळे फरकाची ही तीन टक्के थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली जाईल व यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा समावेश असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe