Post Office Saving Schemes : प्रत्येकजण आपल्या कमाईचा काही भाग वाचवण्याचा प्रयत्न करतो. आणि कुठेतरी गुंतवणूक करतो, जेणेकरून त्याला वृद्धापकाळात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये. आज बाजारात अनेक सेवानिवृत्ती योजना आहे. अशातच भारतीय पोस्ट ऑफिसकडून देखील अनेक प्रकारच्या बचत योजना चालवल्या जातात. त्यातलीच एक म्हणजे अटल पेन्शन योजना. जर तुमच्याकडे सरकारी नोकरी नसेल पण तुम्हाला 60 वर्षांनंतरही पेन्शन हवी असेल तर पोस्ट ऑफिसची अटल पेन्शन योजना उत्तम पर्याय आहे.
अटल पेन्शन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांवर लक्ष केंद्रित करणारी भारतातील नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे. APY अंतर्गत, ग्राहकांच्या योगदानावर अवलंबून 60 वर्षांच्या वयाच्या 1,000 ते 5,000 रुपये प्रति महिना किमान पेन्शनची हमी दिली जाते. भारतातील कोणताही नागरिक APY योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेत गुंतवणूक करताना ग्राहकाचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच, त्याचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत बँक खाते असावे. एपीवाय खात्यात नियतकालिक अपडेट्स मिळण्यासाठी संभाव्य अर्जदार नोंदणीदरम्यान बँकेला आधार आणि मोबाइल क्रमांक देऊ शकतो. मात्र, नावनोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य नाही.

तुमच्या माहितीसाठी, 9 मे 2015 रोजी केंद्र सरकारने माजी पंतप्रधानांच्या नावाने ‘अटल पेन्शन योजना’ सुरू केली. या योजनेंतर्गत वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर प्रत्येक महिन्याला 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळते. अशा परिस्थितीत या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या वृद्धापकाळाला आर्थिक सुरक्षा घेऊ शकता. आज आपण याच योजनेबद्दल सविस्तर जाणून घेणार अहोत.
या अंतर्गत 60 वर्षांचे झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 1000 ते 5000 रुपये पेन्शन मिळते. 18 ते 40 वयोगटातील व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकते. त्याला या योजनेत किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागते. योजनेत सामील होण्यासाठी बचत बँक खाते, आधार आणि सक्रिय मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.
किती गुंतवणूक करावी लागेल?
गुंतवणूक ही निवृत्तीनंतर किती पेन्शन हवी आहे यावर अवलंबून असेल. दरमहा 1 ते 5 हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी ग्राहकाला दरमहा 42 ते 210 रुपये द्यावे लागतील. वयाच्या 18 व्या वर्षी योजना घेतल्यावर हे होईल. त्याच वेळी, जर एखाद्या ग्राहकाने वयाच्या 40 व्या वर्षी ही योजना घेतली तर त्याला दरमहा 291 रुपये ते 1,454 रुपये योगदान द्यावे लागेल. जेवढे ग्राहक योगदान देतील, तेवढे त्याला निवृत्तीनंतर पेन्शन मिळेल. यामध्ये तुम्ही कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभाही मिळतो .













