Post Office Scheme:- आर्थिकदृष्ट्या जर तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर तुम्ही चांगल्या गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे व असा पर्याय निवडावा की त्या ठिकाणी गुंतवलेला तुमचा पैसा तुम्ही चांगल्या पद्धतीने वाढवू शकाल. या दृष्टीने अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत व त्यामध्ये मात्र पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांना गेल्या काही वर्षांपासून प्राधान्य दिले जात आहे.
पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजना असून काही एफडी योजना देखील आहेत व या सगळ्या योजना गुंतवणुकीच्या दृष्टीने उत्तम व चांगल्या परतावा देणाऱ्या आहेत.
यामध्ये जर आपण पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजना बघितली तर ही एक गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. ही सरकारी योजना असून यामध्ये तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते व आकर्षक व्याजदरामुळे ती ताबडतोब वाढायला देखील मदत होते.
कसे आहे पोस्टाच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेचे स्वरूप?
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना ही एक सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सध्या पुढे आली आहे व या योजनेत तुम्ही दरवर्षी एक निश्चित रक्कम जमा करू शकता व त्यावर तुम्हाला 7.1% दराने व्याज मिळते.
विशेष म्हणजे हे व्याज चक्रवाढ व्याजाच्या स्वरूपात जोडले जाते व ज्यामुळे तुमची गुंतवणूक हळूहळू वाढते व या योजनेचा एकूण पंधरा वर्षाचा कालावधी असून यानंतर मात्र तुम्हाला एक मोठी रक्कम हातात मिळते.
या योजनेत दरवर्षी 50 हजार रुपये गुंतवून तुम्हाला किती पैसे मिळतील?
समजा तुम्ही जर पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये प्रत्येक वर्षाला 50 हजार रुपये गुंतवत असाल व अशी गुंतवणूक सलग पंधरा वर्षे कालावधीसाठी तुम्ही सुरू ठेवली तर तुमची एकूण ठेव रक्कम सात लाख पन्नास हजार रुपये होईल.
परंतु यावर चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळाल्याने ही रक्कम पंधरा वर्षानंतर 7.1% वार्षिक व्याजदराने 13 लाख 56 हजार 70 रुपये पर्यंत वाढते. या एकूण रकमेमध्ये तुमची एकूण मुद्दल सात लाख 50 हजार व त्यावर तुम्हाला सहा लाख सहा हजार 70 रुपये व्याज मिळते.
या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून जे काही व्याज मिळते ते तुमच्या ठेवलेल्या रकमेमध्ये जोडले जाते या जोडलेल्या एकूण रकमेवर पुढील वर्षी व्याज मिळायला लागते व या पद्धतीने चक्रवाढ प्रणालीमुळे तुमची एकूण रक्कम वेगाने वाढण्यास मदत होते.
या योजनेत कसे उघडाल खाते?
पीपीएफ योजनेमध्ये तुम्हाला खाते उघडायचे असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ते उघडावे लागते. याकरिता तुमच्याकडे आधार कार्ड,
पॅन कार्ड तसेच पासपोर्ट आकाराचे फोटो व इतर आवश्यक कागदपत्र असणे गरजेचे आहे. सध्या परिस्थितीत तुम्ही हे खाते ऑनलाईन पद्धतीने देखील उघडू शकतात.
कर सवलतीचे मिळतात फायदे
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफ योजना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फायद्याचे आहे व कर बचतीच्या दृष्टिकोनातून देखील ती फायदेशीरच आहे. या योजनेत आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत जमा केलेल्या रकमेवर करात सुट मिळते आणि योजना परिपक्व झाल्यानंतर मिळणारे व्याज आणि तुमची एकूण मिळणारी रक्कम ती देखील करमुक्त असते.
तसेच ही योजना नोकरदार लोक तसेच गृहिणी आणि लहान व्यवसायिकांसाठी उत्तम असा पर्याय आहे. तुम्हाला जर तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल आणि दीर्घ मुदतीसाठी पैसा जमा करायचा असेल तर पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट स्कीम तुमच्यासाठी फायद्याची ठरते.