Discount Offer:- वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर उत्तम वैशिष्ट्य असलेले स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलेले आहेत. तसेच या सणासुदीच्या कालावधीमध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून स्मार्टफोन खरेदीवर उत्तम अशा डिस्काउंट ऑफर देखील देण्यात येत असून ग्राहकांनी याचा लाभ घेणे खूप गरजेचे आहे.
याच प्रकारे जर आपण गुगलच्या दृष्टिकोनातून बघितले तर गुगलने 14 ऑगस्ट रोजी भारतामध्ये गुगल पिक्सल 9 सिरीज लाँच केली व या अंतर्गत चार स्मार्टफोन लॉन्च केले. या चार स्मार्टफोन मधून गुगलने पिक्सल 9 प्रो एक्सएल आणि पिक्सल 9 या स्मार्टफोनची प्री बुकिंग सुरू केली असून फ्लिपकार्ट वर हे दोन्ही स्मार्टफोन लिस्ट करण्यात आलेले आहेत.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे या प्री बुकिंग पेजवर देण्यात आलेला तपशील जर बघितला तर त्यानुसार गुगलच्या पिक्सल 9 प्रो एक्स या स्मार्टफोनवर दहा हजार रुपयांचा इस्टंट डिस्काउंट देखील मिळणार आहे. याच डिस्काउंट ऑफरची माहिती आपण या लेखात बघू.
गुगलच्या या स्मार्टफोनवर मिळणार दहा हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 14 ऑगस्ट रोजी गुगलने भारतामध्ये गुगल पिक्सल 9 सिरीज लॉन्च केली व या अंतर्गत फोल्डसह चार हँडसेट लॉन्च करण्यात आले. यामध्ये कंपनीने पिक्सल नऊ आणि पिक्सल नऊ प्रो एक्सएल चे प्री बुकिंग सुरू केले आहे व फ्लिपकार्टवर हे दोन्ही स्मार्टफोन लिस्ट करण्यात आलेले आहेत.
यामध्ये पिक्सल 9 प्रो एक्स या स्मार्टफोनवर दहा हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देण्यात येणार आहे व याकरता मात्र आयसीआयसीआय बँकेचे कार्ड वापरावे लागणार आहे. तसेच पिक्सल नऊ वर चार हजार रुपयांचा इस्टंट डिस्काउंट मिळणार आहे.
किती आहे google पिक्सल 9 आणि पिक्सल 9 प्रो एक्सएलची किंमत?
जर आपण गुगलच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आलेले आहे या सिरीज अंतर्गत असलेल्या पिक्सल 9 या स्मार्टफोनची किंमत पाहिली तर ती 79 हजार 999 रुपये आहे.
या स्मार्टफोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. तसेच गुगलच्या पिक्सल 9 प्रो एक्सएलची किंमत एक लाख 24 हजार 999 रुपये आहे.
हा नवीन लाईनअप 6 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला जर गुगलचा पिक्सल 9 सिरीज खरेदी करायची असेल तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये खरेदी करू शकतात. सध्या हे फोन फ्लिपकार्ट व्यतिरिक्त रिलायन्स डिजिटल आणि क्रोमा सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहेत.