दिवाळी आधीच धमाका ! ‘या’ 5 शेअर्सने एकाच महिन्यात पैसे केले दुप्पट

Ahilyanagarlive24 office
Updated:

share market : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. परंतु शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांची आधीच दिवाळी साजरी झाली आहे. याचे कारण म्हणजे गेल्या महिनाभरात अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकाच महिन्यात दुप्पट झाले आहेत.

मार्केटमध्ये असे टॉप 5 शेअर्स होते ज्यांनी एकाच महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे पैसे एकाच महिन्यात दोन लाख रुपये झाले असते. जर तुम्हाला या शेअर्सबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांची संपूर्ण माहिती इथे मिळवू शकता.

Sky Gold : स्काय गोल्डचा शेअर एक महिन्यापूर्वी 331.10 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 760.75 आहे. अशा प्रकारे, या शेअर्सने गेल्या एका महिन्यात सुमारे 129.76 टक्के परतावा दिला आहे.

Trishakti Electronics & Industries Ltd : महिनाभरापूर्वी त्रिशक्ती इलेक्ट्रॉनिक्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरची किंमत 39.22 रुपये होती. तर, या शेअरचा दर 84.92 इतका आहे. अशा प्रकारे या शेअरने गेल्या महिन्याभरात जवळपास 116.52 टक्के परतावा दिला आहे.

Indo Asia Finance : इंडो एशिया फायनान्सचा शेअर महिनाभरापूर्वी 11.99 रुपयांवर व्यवहार करत होता. हा शेअर आता 25.93 रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात या शेअर्सने 116.26 टक्के परतावा मिळाला आहे.

Bondada Engineering : Bondada इंजिनिअरिंगचा शेअर हा महिन्यापूर्वी 177.30 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरचा दर 366.40 आहे. अशा प्रकारे, या शेअर्सने गेल्या एका महिन्यात सुमारे 106.66 टक्के परतावा दिला आहे.

Hindustan Bio Sciences Ltd : हिंदुस्थान बायो सायन्सेस लिमिटेडचा (एचबीएल) भाव महिनाभरापूर्वी 5.56 रुपयांवर होता. हा शेअर आता 10.62 रुपये प्रति शेअरवर ट्रेड करत आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात या शेअर्सने 91.01 टक्क्यांच्या आसपास रिटर्न दिला आहे.

टीप : येथे शेअर्सच्या रिटर्नविषयी माहिती दिली आहे. तुम्ही गुंतवणुकीपूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe