FD Interest Rate:- गुंतवणुकीची सुरक्षितता आणि मिळणारा हमी परतावा या दृष्टिकोनातून बँकांच्या आणि पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनांना गुंतवणूकदारांकडून खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते. कारण कष्टाने कमवलेल्या पैशांची गुंतवणूक सुरक्षित राहणे खूप महत्त्वाचे असते व त्याकरिताच विश्वसनीय अशा पर्यायांमधील गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे असते.
सामान्यपणे आपण बघतो की,गुंतवणुकीसाठी मुदत ठेव योजना म्हणजेच फिक्स डिपॉझिट योजनांना प्राधान्य दिले जाते या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक कालावधी असतो व वेगवेगळ्या कालावधी करिता वेगळे बँकांकडून केलेल्या मुदत ठेवीना वेगवेगळ्या प्रकारचे व्याज दिले जाते.
या अनुषंगाने तुम्हाला देखील जर एक वर्षाच्या कालावधी करिता एफडी करून चांगल्या पद्धतीने व्याज मिळवायचे असेल तर आपण या लेखामध्ये अशा काही बँकांची माहिती घेणार आहोत जे एक वर्षाचे एफडीवर जवळपास आठ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.
या बँका देतात एक वर्षाच्या मुदत ठेवीवर उत्तम व्याज
1- कॅनरा बँक– जर कॅनरा बँकेमध्ये एफडी केली तर ही बँक सर्वसाधारण ग्राहकांना एक वर्षाचे एफडीवर सात टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना एक वर्षाच्या एफडीवर 7.50 टक्के इतके व्याज देत आहे.
2- कर्नाटक बँक– कर्नाटक बँकेत एफडी केल्याने देखील ग्राहकांना चांगला परतावा मिळू शकतो. कारण ही बँक देखील सर्वसाधारण ग्राहकांना एक वर्षाच्या मुदत ठेवीवर सात टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.40% इतके व्याज देते.
3- बँक ऑफ इंडिया– बँक ऑफ इंडिया ही एक देशातील महत्त्वाची बँक असून जर ग्राहकांनी या बँकेत एक वर्षाची एफडी केली तर बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50% इतके व्याज दिले जात आहे.
4- स्टेट बँक ऑफ इंडिया– स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात महत्त्वाची आणि मोठी बँक असून या बँकेत जर एक वर्षाच्या मुदतीसाठी एफडी केली तर बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना 6.80% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.30% इतके व्याज दिले जात आहे.
5- बँक ऑफ बडोदा– बँक ऑफ बडोदा मध्ये जर एक वर्षाच्या मुदतीसाठी एफडी केली तर या बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना सात टक्के आणि जेष्ठ नागरिकांना 7.25 टक्के इतके व्याज दिले जात आहे.
6- सेंट्रल बँक ऑफ इंडिया– सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही देखील भारतातील एक महत्त्वाची बँक असून या बँकेमध्ये जर एक वर्षाच्या कालावधी करिता सर्वसामान्य ग्राहकांनी एफडी केली तर त्यांना 6.75 टक्के इतके व्याज दिले जात असून त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना 7.25% इतके व्याज दिले जात आहे.
7- आरबीएल बँक– आरबीएल बँकेच्या माध्यमातून जर ग्राहकांनी एक वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर सर्वसाधारण ग्राहकांना सात टक्के इतके व्याज दिले जात असून ज्येष्ठ नागरिकांना 7.50% इतके व्याज दिले जात आहे.