फेसबुकसाठी करा ‘हे’ काम आणि मिळवा 77 लाख

Published on -

सोशल मीडियाच्या अनेक माध्यमांपैकी फेसबुक हे सर्वात जास्त वापरले जाणारे आणि प्रसिद्ध असे ऍप आहे. परंतु बऱ्याचदा यावर वादग्रस्त मेसेज पसरवून धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातो.

असे संदेश रोखण्यासाठी सोशल मीडिया कंपनी फेसबुक वेगवेगळे पावले उचलत आहे. अशा हिंसक मेसेज, व्हिडीओ फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवरून त्वरित हटवत असते.

हे मीम्स थांबविण्यासाठी आता फेसबुकने डेव्हलपर्ससाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. . डेव्हलपर्सला डाटा देण्यासाठी फेसबुककडे स्वतःचा डेटाबेस आहे. या प्रोजेक्टचा उद्देश वेगवेगळे फोटो एनालिसिस करून त्याचे वर्गीकरण करणे आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे कोणते मीम्स हिंसा पसरवणारे आहेत, याचा शोध घेतला जाईल. डेव्हलपर्सला हिंसक मीम्स शोधण्यासाठी खास टूल तयार करावे लागेल.

ही स्पर्धा जिंकणाऱ्याला 1 लाख डॉलर (77 लाख रुपये) फेसबुककडून देण्यात येणार आहे ड्रिवनडेटा टीमसोबत मिळून या स्पर्धेचे आयोजन केले जाईल.

यात डाटा सायंटिस्ट भाग घेतील. जी टीम कोड क्रॅक करेल, त्या टीमला 77 लाख रुपये बक्षीस मिळेल. यासाठी drivendata.org वेबसाईटवर जाऊन सहभागी होता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News