Dog Breeding Business: डॉग ब्रीडिंग व्यवसाय करा आणि कमी गुंतवणुकीत लाखो कमवा

Published on -

Dog Breeding Business:- बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असून नोकऱ्यांचे प्रमाण त्यामानाने खूपच अत्यल्प असल्याने आता प्रत्येक जण आपले उत्पन्न वाढवण्यासाठी अनेकविध कल्पनांचा विचार करतात व त्यानुसार व्यवसाय सुरू करतात. जर व्यवसायांचा विचार केला तर खूप असे छोटे मोठे आणि कमी भांडवलात जास्त नफा देणारे व्यवसाय उपलब्ध असून त्या माध्यमातून सातत्याने आता उत्पन्न वाढवण्यासाठी व्यक्ती प्रयत्न करत असताना दिसून येत आहे.

अशा उपलब्ध व्यवसायांपैकी जर आपण शेती आधारित काही व्यवसायांचा विचार केला तर यामध्ये पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, वराह पालन, ससे पालन, बटर पालन इत्यादी प्राण्यांशी संबंधित व्यवसाय आपल्याला सांगता येतील. परंतु यामध्ये श्वानपालन म्हणजेच कुत्रे पाळण्याचा व्यवसाय देखिल आता खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारत असून येणाऱ्या काळामध्ये हा खूप चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय सिद्ध होऊ शकतो. यामध्ये कुत्रा पालन व्यवसाय सुरू करण्यामध्ये कुत्र्यांच्या देखील अनेक प्रकारच्या प्रजाती असतात व अशा दर्जेदार प्रजातींच्या कुत्र्यांचे पालन केले तर त्या माध्यमातून चांगला पैसा मिळू शकतो.

श्वानपालन व्यवसायासाठी कुत्र्याच्या महत्त्वाच्या प्रजाती

1- लेब्राडोर जर भारताचा विचार केला तर लेब्राडोर जातीच्या कुत्र्याला सर्वात जास्त पसंती मिळताना आपल्याला दिसून येते. या जातीच्या कुत्र्याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे या जातीचे कुत्रे खूपच मनमिळाऊ असतात व अतिशय हुशार असतात त्यामुळे त्यांना सहज प्रशिक्षित देखील करता येते. महत्वाचे म्हणजे कोणत्याही वातावरणामध्ये ते सहज जुडवून घेतात. लेब्राडोर जातीच्या कुत्र्यांच्या संगोपनासाठी जास्त पैसे गुंतवण्याची गरज नसते.

2- डॉबरमॅन कुत्र्यांची ही जात देखील खूप महत्त्वाची असून जगभरातील पोलीस दलांमध्ये डॉबरमॅन जातीचे कुत्रे जास्त प्रमाणात दिसून येतात. भारतात देखील या जातीचे कुत्रे पाळले जातात.

3- इंडियन स्पीट्स भारतीय स्पिट्स आणि पोमेरिनियन या जातीच्या कुत्र्यांना लोक एकच मानतात परंतु या दोन्ही जाती वेगवेगळ्या असून या दोन जातींमधील महत्त्वाचा फरक म्हणजे पोमेरेनियन जातीचे कुत्रे हे भारतीय स्पिट्स जातीच्या कुत्र्यांपेक्षा लहान दिसतात व त्यांचे वजन देखील कमी असते.

 डॉग ब्रीडिंग म्हणजेच कुत्रा पालन व्यवसाय कसा सुरू करावा?

या व्यवसायामधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या कुत्र्यांच्या पिल्लांना संगोपन करून त्यांची विक्री करणे हे पाहिजे तेवढे सोपे काम नाही. याकरिता तुम्हाला या व्यवसायाचे एक व्यवस्थित प्लॅनिंग तयार करणे गरजेचे आहे. तसेच हा व्यवसाय जर तुम्हाला मोठ्या स्तरावर सुरू करायचा असेल तर त्यात गुंतवणूक थोडी जास्त प्रमाणात करावी लागेलच परंतु कुत्र्यांच्या पिल्लांची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पिल्लांची काळजी खूप विशेष पद्धतीने घ्यावी लागते.

 कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

1- आवश्यक प्रशिक्षण घ्यावे हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कुत्र्यांची सर्व प्रकारची माहिती घेणे गरजेचे आहे व त्याकरिता तुम्हाला प्रशिक्षण घ्यावे लागेल. तुम्हाला जर कुत्र्यांविषयी काही माहिती नसेल तर तुम्ही ग्राहकांना काय माहिती देणार त्यासाठी तुम्हाला या व्यवसायाविषयी अनेक जातींविषयी माहिती घेण्याकरिता प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

2- हा व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना असतो आवश्यक कुत्रा पालनाचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला परवाना घेणे गरजेचे असते. याकरिता तुम्ही तुमच्या स्थानिक प्राधिकरणाशी संपर्क साधू शकता व याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊ शकता.

 कशा पद्धतीने आहे संधी?

तर या व्यवसायाचा विचार केला तर अनेक व्यक्तींना कुत्रे पाळण्याची खूप आवड असते व त्यामुळे बरेच लोक हे कुत्रे खरेदी करतात व त्याला बाजारात कायम मागणी आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून खूप चांगला नफा महिन्याला मिळू शकतो. जितके ग्राहक जास्त असतील तितका तुमचा नफा या व्यवसायातून वाढतो व तुम्ही लाखोंची कमाई करू शकतात.

या व्यवसायाची जर तुम्ही संपूर्ण प्लॅनिंग तयार केली आणि त्या प्लॅनिंग नुसार योग्य काम केले तर तुम्हाला या व्यवसायातून खूप नफा मिळू शकतो. मोठ्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये देखील ज्या लोकांना कुत्रे पाळण्याचा छंद आहे असे लोक लाखो रुपये खर्च करायला देखील मागेपुढे पाहत नाही. त्यामुळे तुम्हाला जर चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला ग्राहकांच्या मागणीनुसार या व्यवसायात काम करणे गरजेचे आहे.

 श्वानपालन व्यवसायातील धोके

कुठलाही व्यवसाय म्हटले म्हणजे त्यामध्ये धोका किंवा जोखीम असतेस आणि म्हणून योग्य तयारी करूनच व्यवसायाला सुरुवात करणे खूप फायद्याचे ठरते. त्याच पद्धतीने या व्यवसायात देखील काही धोके आहेत. जसे की या व्यवसायामध्ये तुम्हाला पक्के लक्षात ठेवावे लागेल की एकाच कुटुंबातील किंवा जातीच्या कुत्र्यांची एकमेकांसोबत पैदास करू नये

तसेच तुमच्या फार्म मधील सर्व कुत्र्यांच्या आरोग्य विषयी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जर कुत्र्यांच्या प्रकृतीवर किंवा आरोग्यावर विपरीत परिणाम झाला तर कुत्र्यांचे प्रजनन व्यवस्थित होत नाही व त्याचा अनिष्ट परिणाम हा तुमच्या व्यवसायावर होण्याची शक्यता असते.

त्यामुळे योग्य प्लॅनिंग व प्रशिक्षण व बाजारपेठेची माहिती घेऊन डॉग ब्रीडिंग व्यवसाय देखील खूप फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe