Gold Price:- सोन्याचे दर गेले कित्येक महिन्यापासून उच्चांकी पातळीवर असून थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला सोन्याच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना जेव्हा सोन्याच्या आयात शुल्कामध्ये कपात केली तेव्हा मात्र सोन्याचे दर काहीसे घसरल्याचे चित्र होते.
परंतु त्यानंतर मात्र सोन्याच्या दरामध्ये अजून वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे. भारताच्या दृष्टिकोनातून बघितले तर सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने येणाऱ्या कालावधीमध्ये सोन्याच्या दरांची स्थिती कशी राहणार? याबाबत देखील अशा गुंतवणूकदारांच्या मनात उत्सुकता आहे.
परंतु या बाबतीत जर आपण या क्षेत्रातील जाणगारांच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांच्यामध्ये येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये सोन्याचे भाव परत वाढण्याची शक्यता आहे व बाजारामध्ये सोन्याचे दर एक नवीन विक्रम स्थापित करू शकतात. या सोन्याच्या दरवाढी मागे सणासुदीचा कालावधी हे कारण आहेच परंतु इतर कारणे देखील महत्त्वाचे ठरणार आहेत.
सोन्याच्या बाजारभावात या कारणांमुळे होऊ शकतो वाढ
1- सणासुदीचा कालावधी ठरेल महत्त्वाचा– सध्या देशामध्ये सणासुदीचा कालावधी सुरू झाला असून त्यासोबत येणाऱ्या काही महिन्यांमध्ये लग्नसराईचा हंगाम देखील सुरू होणे अपेक्षित असल्यामुळे देशभरात सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मागणीत वाढ झाल्यामुळे सोन्याच्या दरात देखील वाढ होऊ शकते. तसेच आता दिवाळी देखील तोंडावर आली असल्यामुळे धनत्रयोदशीला संपूर्ण देशात सोन्याच्या मागणीत वाढ होते. त्यामुळे या क्षेत्रातील जाणकारांचे मत पाहिले तर त्यांच्या मतानुसार धनत्रयोदशीला सोन्याच्या भावात विक्रमी वाढ होऊ शकते.
2- अमेरिकेतील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व व्याजदरात कपात करण्याची शक्यता– अमेरिकेमध्ये सध्या मंदीची परिस्थिती असूनही वाढती मंदी लक्षात घेता अमेरिकेतील महत्त्वाची केंद्रीय बँक फेडरल रिजर्व आपल्या व्याजदरामध्ये कपात करण्याची शक्यता आहे.
याबाबतचा दबाव देखील अमेरिकन सरकारवर असल्यामुळे या बँकेच्या व्याजदरात कपात होऊ शकते व जर असे व्याजदरामध्ये कपातीचा निर्णय झाला तर सोन्याच्या भावात वाढ होणार हे नक्की मानले जात आहे.
3- काही देशांमधील युद्धजन्य परिस्थिती– जर आपण जागतिक परिस्थितीच्या दृष्टिकोनातून बघितले तर रशिया आणि युक्रेन व इस्रायल व हमास या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असून युद्ध सुरू आहे. जेव्हा जागतिक पातळीवर अशा प्रकारचे संकट येते तेव्हा सोन्याच्या भावात आणखीन वाढ होते असे आपल्याला अनेक घटनांवरून दिसून आलेले आहे.
या देशांमधील परिस्थितीमध्ये जर आणखी बिघाड झाला तर मात्र सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा प्रकारचे जर जागतिक पातळीवर राजकीय तणाव राहिले तर जागतिक पुरवठा साखळीवर याचा गंभीर परिणाम होतो
व या परिणामांची धग आर्थिक बाजारामध्ये देखील दिसते. अशा परिस्थितीमध्ये जोखीम कमी व्हावी याकरिता बरेच गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढवतात व यामुळे देखील सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.